India Iran Trade After US Sanctions; अमेरिकेचा इराणशी वैर अन् धग भारताला, भारताच्या तांदूळ, चहा, औषध निर्यातीला धोका; ट्रम्प यांनी खेळला आर्थिक नाकेबंदीचा डाव
India Iran Trade After US Sanctions; अमेरिकेचा इराणशी वैर अन् धग भारताला, भारताच्या तांदूळ, चहा, औषध निर्यातीला धोका; ट्रम्प यांनी खेळला आर्थिक नाकेबंदीचा डाव
US Sanctions on Iran: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आर्थिकदृष्ट्या एकाकी पाडण्याच्या उद्देशाने नवीन मोहीम सुरू केली आहे. ट्रम्प प्रशासनाने इराणसोबत व्यापार सुरू ठेवणाऱ्या परदेशी कंपन्या आणि देशांवर निर्बंध लादले जाण्याचा इशारा दिला, ज्यामध्ये अमेरिकेच्या वित्तीय प्रणालीतून वगळले जाऊ शकते. अमेरिकेच्या पश्चिम आशियातील या देशावरील निर्बंधांचा परिणाम भारताच्या इराणला होणाऱ्या निर्यातीवरही होऊ शकतो, विशेषतः तांदूळ, चहा आणि औषध उत्पादनांच्या निर्यातीवर वाढीव दबाव येऊ शकतो.
अमेरिकेच्या निर्बंधांविरुद्ध कारवाईचा इराणचा इराण
त्याचवेळी, अमेरिकेच्या अलीकडच्या हालचालींनंतर इराणनेही अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आर्थिक मोहिमेत सामील कोणत्याही देशाविरुद्ध प्रत्युत्तर द्यायचा निर्धार स्पष्ट केला. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट यांनी या मोहिमेचे वर्णन इराणविरुद्ध ‘आर्थिक डी-डे’ असे केले.
इराणच्या 5 सर्वात मोठ्या व्यापारी भागीदारांपैकी भारत एक राहिला आहे. 2019 पासून दोन्ही देशांमधील व्यापारात आधीच लक्षणीय घट झाली असून या काळात अमेरिकेने इराणी तेलावरील निर्बंधांमधील सूट रद्द केली ज्यामुळे भारतीय तेल रिफायनरी कंपन्यांनी अमेरिकेची बाजार आणि आर्थिक प्रणालीमधील आपला प्रवेश धोक्यात येऊ नये म्हणून इराणकडून कच्च्या तेलाची आयात जवळजवळ थांबवली.
दरम्यान, अमेरिकेच्या अलीकडच्या कारवाईमुळे भारतीय निर्यातदारांची चिंता वाढवली आहे. अलिकडच्या वर्षांत भारताचा इराणसोबत तांदूळ, चहा आणि औषधांचा व्यापार मोठ्या प्रमाणावर दुबईमार्गे होत असल्याचा रॉयटर्सने अहवालातून दावा केला, तर या निर्बंधांमुळे, विशेषतः बासमती तांदळाच्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 2026 च्या पहिल्या सहामाहीत भारताने इराणला अंदाजे 383 दशलक्ष डॉलर्स किमतीचा तांदूळ निर्यात केला होता.
औषधनिर्माण अन् चहा व्यापारावरही परिणाम
तांदळाव्यतिरिक्त भारत इराणला चहा आणि औषधनिर्माण उत्पादने देखील निर्यात करतो. इराणसोबत आर्थिक व्यवहार किंवा व्यापार करणाऱ्या कंपन्यांना अमेरिकेच्या निर्बंधांचे लक्ष्य बनू शकते. अशा परिस्थितीत, ट्रम्प प्रशासनाच्या कारवाईमुळे भारतीय कंपन्यांना इराणकडून पैसे मिळवणे, बँकिंग प्रणाली वापरणे आणि मालाचा पुरवठा कायम ठेवणे आव्हानात्मक ठरू शकते.
भारताला इराणी तेलाची चिंता
भारत-इराण यांच्यातील व्यापार केवळ निर्यातीपुरता मर्यादित नाही. इराणी क्रूडदेखील दोघांच्या व्यापारी भागीदारीचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. 2026 च्या पहिल्या सहामाहीत भारताने इराणकडून अंदाजे 707 दशलक्ष डॉलर्स किमतीच्या क्रूडची आयात केली असून मध्यपूर्वेतील संघर्षाच्या युद्धविरामाच्या काळातील सवलतीमुळे आयात शक्य झाली. याव्यतिरिक्त इराण भारताला सफरचंद, बदाम, खजूर, एलपीजी आणि किवी अशा उत्पादनांची आयात देखील करतो.
लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.
मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.
पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.
2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.
शैक्षणिक पात्रता
प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.… आणखी वाचा