Hema Malini On Dharmendra : हेमा मालिनी यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये धर्मेंद्र यांच्याबद्दल भाष्य केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी मोठ्या पडद्यावर प्रचंड प्रसिद्धी आणि ओळख मिळवली आहे. अनेक वर्षे बॉलिवूडवर राज्य केल्यानंतर, ‘ड्रीम गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेमा आता राजकारणात सक्रीय आहेत. २०२४ मध्ये तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये निवडून येणाऱ्या हेमा यांनी आता त्यांचे दिवंगत पती आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्याबद्दल एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की, राजकारणात येण्याच्या त्यांच्या निर्णयाला धर्मेंद्र यांचा विरोध होता. त्यांनी यामागील कारणही स्पष्ट केलं.
हेमा मालिनी म्हणाल्या, ‘सुरुवातीला त्यांना माझी खूप काळजी वाटायची. ते खूप घाबरून जायचे आणि अस्वस्थ व्हायचे. जेव्हा मी निवडणुकीच्या प्रचारासाठी गर्दीत जायचे, तेव्हा त्यांना माझ्या सुरक्षेची काळजी वाटायची. ते म्हणायचे, ‘अशा गर्दीत जा, फक्त सुरक्षित राहा.’ ते विचारायचे, ‘जाण्याची गरज आहे का?’ आणि मी म्हणायचे, ‘पक्ष मला आमंत्रित करत आहे, म्हणून मला जायलाच पाहिजे.”
Phulwa Khamkar : अनिल बर्वेंची लेक झाली खामकर मसालेवाल्यांची सून, मराठीसह ‘फुलवा’ बॉलिवूडमध्ये गाजली
हेमा यांनी पुढे सांगितलं की, प्रचारादरम्यान त्यांना त्यांच्या खऱ्या लोकप्रियतेची जाणीव झाली. हेमा मालिनी पुढे म्हणाल्या की, ‘लोक माझ्यावर किती प्रेम करतात, हे मला माझ्या प्रचारादरम्यान जाणवलं. मी त्यांना विचारायचे की, ते मला भेटायला आले होते का, आणि ते म्हणायचे, ‘हो.” Raja Chaudhary : ‘लग्नानंतरही एका अभिनेत्यासोबत तिचं अफेअर होतं’, श्वेता तिवारीबद्दल एक्स पती राजा चौधरीचा धक्कादायक दावा काही दिवसांपूर्वीच, एका मुलाखतीदरम्यान हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या शेवटच्या इच्छेचाही उल्लेख केला. धर्मेंद्र यांची शेवटची इच्छा काय होती, असं त्यांना विचारण्यात आलेलं. त्यावर अभिनेत्रीनं सांगितलेलं की, कुटुंबाला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे. सर्वांसोबत, कुटुंबासोबत राहून काम सुरू ठेवलं पाहिजे, हीच धर्मेंद्र यांची शेवटची इच्छा होती. दरम्यान, धर्मेंद्र यांचं २५ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा