Headlines

Govinda : ‘माझी बदनामी करण्याची कोणती कसर सोडली नाही, तुला माझी गरज भासू शकते, शिवराळ भाषा वापरणं बंद कर’, गोविंदाचा सुनीतावर संताप


Govinda On Sunita Ahuja : सुनीता अहुजानं काल गोविंदाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं. यावर आता अभिनेत्यानं संताप व्यक्त केला असून पत्नीला सडेतोड उत्तर दिलं आहे.

Govinda On Sunita Ahuja
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – पत्नी सुनीताच्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे गोविंदा प्रचंड संतापला आहे. गोविंदा आणि त्याची सह-अभिनेत्री कोमल राणीच्या व्हायरल व्हिडिओवर, सुनीता म्हणाली की, गोविंदा आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीला डेट करत आहे आणि त्याला लाज वाटायला हवी. इतकंच नाही, तर सुनीतानं गोविंदाला त्या अभिनेत्रीचा ‘शुगर डॅडी’ असंही म्हटलं होतं. आता, गोविंदानं सुनीताला अशा वक्तव्यांबद्दल ताकीद दिली असून, सुनीतानं आपल्या मर्यादा जाणून राहायला पाहिजे असं म्हटलं आहे.

गोविंदाची सुनीताच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

गोविंदा म्हणाला की, ‘आता जेव्हा मी एका चित्रपटाचं काम सुरू केलं आहे, तेव्हा मी लोकांच्या मनातून उतरावं, माझी बदनाम व्हावी किंवा माझ्या व्यवसायाचं नुकसान व्हावं, यासाठी तुम्ही कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. एखाद्या गरीब कुटुंबातून जेव्हा लोक इंडस्ट्रीत येतात, तेव्हा त्यांना इतकं बदनाम करू नका की ते घाबरून पळून जातील. तुमच्याकडे क्षमता आहे, ताकद आहे. प्रसिद्धी, सन्मान आणि संपत्ती हे सर्व तुम्हाला देवानं दिलं आहे. पण याचा अर्थ असा नाही की, ज्यांच्याकडे हे सर्व नाही, त्यांचा तुम्ही अपमान करावा.’

Miss World स्पर्धेत मानुषी छिल्लरने सादर केलेले डान्स Nakul Ghanekar याने केलेले कोरिओग्राफ

सुनीता गोविंदाच्या वयावरून बोलली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना अभिनेता म्हणाला की, ‘वयाचा हा जो विषय तुम्ही काढला आहे, त्याबद्दल मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो की, देशातील सर्व मोठ्या कलाकारांनी तरुण मुलींसोबत काम केलं आहे. त्या अभिनेत्रींना चांगले चित्रपट, नाव, प्रसिद्धी आणि सन्मान मिळाला, तर अभिनेत्यांना अशा नवोदित कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे ते मोठ्या पडद्यावर तरुण दिसले. बहुतेक, मी तरुण दिसू नये अशीच तुमची इच्छा असावी. तुम्ही तुमच्या छोट्याशा अपेक्षांसाठी एका मोठ्या व्यवसायाचं नुकसान करत आहात. तुमच्या मागे जी गँग आहे, त्याबद्दल सर्वांना माहित आहे.’

Maharashtra TimesVishal Aditya Singh : 7 वर्षांनी मोठ्या श्वेता तिवारीसोबत अफेअरच्या चर्चा, लोकप्रिय अभिनेत्यानं सोडलं मौन; काय म्हणाला?
‘मला वाटतं की पुढेही कधी ना कधी, कुठल्या ना कुठल्या वळणावर तुम्हाला माझी गरज भासू शकते. त्यामुळे कृपया अशी वक्तव्यं करून, पॉडकास्टमध्ये माझी जी बदनामी केली जात आहे, ती थांबवा आणि थोडं आपल्या मर्यादेत राहा. हीच तुम्हाला विनंती आहे. मला हे पुन्हा सांगावंसं वाटतं की, सुनीताजी, तुम्ही खूप शिवराळ भाषेचा वापर वापरत आहात. लोकांनी तुमच्या या स्वभावाकडून काही प्रेरणा घेऊ नये, एवढीच प्रार्थना आहे. तरुण पिढी तुमच्याकडे पाहतेय आणि शिकतेय. जर लोकांनी तुमच्याशी याच भाषेत बोलायला सुरुवात केली, तर ते आपल्या सर्वांसाठीच लाजिरवाणं ठरेल. त्यामुळे असं करू नका. तुम्ही असे शब्द जाहीरपणे वापरणं अपेक्षित नाही.’ असं गोविंदा शेवटी म्हणाला आहे.

काय म्हणालेली सुनीता?

सुनीता म्हणालेली की, ‘आधी सिनेमा बनवायला लागतो, चित्रपट बनल्यानंतर प्रमोशन होतं. काय बोलायचं! लेकीच्या वयाच्या मुलीला घेऊन फिरतोय. त्याला थोडी लाज वाटायला पाहिजे. त्यानं काहीतरी मर्यादा पाळायला पाहिजेत.’

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा