Todays’ Gold-Silver Rates: सोमवार, आठवड्याच्या पहिल्या व्यवहार दिवशी, सोने आणि चांदीच्या दरांमधील घसरता आलेख कायम राहिला आहे. प्रमुख आशियाई बाजारांमध्ये सोन्याच्या प्रत्यक्ष मागणीत घट दिसून आली असून भारतात दागिन्यांची मागणी मंदावली आणि किमती कमी होण्याची शक्यतेमुळे अनेकांनी पाठ फिरवली असून सोन्यावरील सवलतींचे प्रमाण गेल्या महिनाभरातील उच्चांकी पातळीवर पोहोचले.
सोने-चांदीच्या दरांवर गेल्या काही दिवसांपासून घसरणीच्या लाल रंगाचे वर्चस्व पाहायला मिळत असून MCX, COMEX तसेच भारतातील सराफा आणि आंतरराष्ट्रीय स्पॉट किंमतीतील चढ-उतारांनी गुंतवणूकदारांना जोरदार धक्का बसला आहे.
20 जुलै 2026 पासून सुरू होणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदार अमेरिकेतील व्याजदरांविषयी नवीन संकेतांसाठीअमेरिकेतील साप्ताहिक बेरोजगारीचे दावे आणि PMI, तसेच युरोप आणि चीनमधील चलनविषयक धोरणाचे निर्णय आणि प्रमुख आर्थिक निर्देशांक यासारख्या महत्त्वाच्या डेटावरही लक्ष ठेवून असतील.
यादरम्यान सोमवारी, 20 जुलै रोजी, सकाळी 9.15 वाजता MCX वर सोन्याचा वायदा दर 0.39 टक्के वाढून 1,41,460 रुपयांवर वाढला तर, चांदीचा दर 3,033 रुपयांनी किंवा 1.45o वाढून 2,19,425 रुपये किलोवर पोहोचला आहे.
मौल्यवान धांतूंचा बाजार सध्या दोन परस्परविरोधी हालचालींमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे पश्चिम आशियातील वाढती भू-राजकीय अनिश्चितता तर दुसरीकडे, कठोर चलनविषयक धोरणाची अपेक्षा वाढे आहे.
अलीकडेच जॉर्डनमधील अमेरिकेशी संबंधित आस्थापनांवरील हल्ल्यांनंतर इराणवर वॉशिंग्टनच्या हवाई हल्ल्यांमुळे मध्य-पूर्वेतील तणाव वाढला, ज्यामुळे गुंतवणूकदार सावध झाले. त्याचवेळी,आगामी फेड रिझर्व्हच्या बैठक आणि व्याज दरांबाबत धोरणकर्त्यांच्या टिप्पण्यांवर सर्वांचे लक्ष केंद्रित असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
Women’s Property Rights: पत्नीला माहेरून मिळालेल्या संपत्तीवर पती अन् सासरच्यांचा किती हक्क? जाणून घ्या नियम, नाहीतर अडचणीत याल याशिवाय चीनमधील प्रीमियम दरात फारसा बदल झालेला नाही, पण किरकोळ मागणीत घट झाल्याचं दिसून येत आहे. प्रत्यक्ष खरेदीतील या कमजोरीमुळे बुलियन किमतींवरील दबाव वाढला आहे, विशेषतः अशा वेळी जेव्हा व्याज दरांबाबत अपेक्षा आणि भू-राजकीय घडामोडींमुळे जागतिक गुंतवणूकदार आधीच सावध पवित्रा घेत आहेत. भारत आणि चीन जगातील सोन्याचे सर्वात मोठे ग्राहक देश असून या दोन्ही देशांमधील मागणीच्या कलकडे बारकाईने लक्ष ठेवले जाते.
लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.
मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.
पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.
2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.
शैक्षणिक पात्रता
प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.… आणखी वाचा