Ghatkopar Landslide Viket Yadav dies on Birthday : ‘लेकाचे औक्षण करुन त्याच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची होती; पण आदल्या दिवशीच तो आम्हाला सोडून गेला’ असे सांगताना विकेतची आई छाया ओक्साबोक्शी रडायला लागली.

बुधवारी पहाटे दरड कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांच्या शब्दाशब्दांत जगण्याची असहायता व्यक्त होत होती. एकाच कुटुंबातील चौघांवर काळाने घाला घातला. त्या कुटुंबातील दोन चिमुकल्यांचे मृतदेह ताब्यात घेताना नातलगांच्या अश्रूंचा बांध फुटला.
वाढदिवशीच मरणाने जवळ केलं
या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या विकेत यादव (२७) याचा आज, गुरुवारी वाढदिवस होता. आयुष्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या विकेतने वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच जगाचा निरोप घेतला. ‘त्याचे औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची होती; पण आदल्या दिवशी तो आम्हाला सोडून गेला’, असे सांगताना विकेतची आई छाया ओक्साबोक्शी रडू लागली. ‘लेकाला आता कुठे शोधू?’, हा तिचा अस्वस्थ करणारा प्रश्न ऐकून राजावाडी रुग्णालयाच्या आवारातील प्रत्येकाचे डोळे पाणावले.
Talasari Crime : मित्रासोबत घरी जाताना बाईक बिघडली, वाटेत सहा जणांनी बंगल्यात ओढून नेलं, 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार, पालघर हादरलं“त्याच्या भावांनी त्याच्यासाठी भेटवस्तू आणल्या होत्या. मंगळवारी रात्री उशिरा तो मित्रांसोबत आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी एका खोलीत गेला होता. आत इंटरनेट मिळत नसल्याने तो थोडा वेळ बाहेर आला आणि नेमक्या त्याच वेळी दरडीचा मोठा भाग त्याच्या अंगावर कोसळला.” असं आईने सांगितलं. त्याचे धाकटे भाऊ, रोहित (२४) आणि योगेश (२१), राजावाडी रुग्णालयात त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी करत होते.
“आम्ही त्याचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन केले होते. पण आता आम्ही अशा एका प्रसंगासाठी एकत्र आलो आहोत, ज्याची आम्ही कधीच कल्पना केली नव्हती,” असे रोहित म्हणाला. त्याचा चुलतभाऊ शुभम बनसोडे याने सांगितले की, विकेत आपल्या आईला आधार देण्यासाठी मिळेल ती छोटी-मोठी कामे करायचा.
‘मी अडकलो आहे… मला वाचवा’
विकेतसोबत असलेल्या सद्दामने घरावर दरड कोसळल्याचे कळताच घाबरलेल्या अवस्थेत घरी फोन केला. ‘मी अडकलो आहे… मला वाचवा’, अशी विनवणी त्याने केली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत विकेत आणि सद्दाम दोघेही ढिगाऱ्याखाली दबले गेले. सद्दामचा हा फोन अखेरचा ठरला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता.
भाच्यांना वाचवले; पण मुलगा गेला…
गौशिया चाळीच्या परिसरात मूळचे अयोध्येचे कमल हसन अन्सारी आणि त्यांच्या बहिणीचे घर जवळजवळ आहे. बुधवारी पहाटे कमल यांच्या बहिणीच्या घरावर दरड कोसळली. त्यावेळी कमल यांचा १६ वर्षांचा मुलगा मोहम्मद आपल्या आत्याच्या झोपायला गेला होता. दरड कोसळल्यानंतर कमल यांनी बहिणीच्या घराकडे धाव घेतली. ढिगाऱ्याखालून त्यांनी दोन भाच्यांना बाहेर काढले; मात्र मोहम्मदचा जीव वाचवण्यात अपयश आले.
आत्याच्या घरी भाच्याचा मृत्यू
कुटुंबाला हातभार लागावा म्हणून छोटा व्यवसाय करण्याच्या उद्देशाने दिल्लीहून मुंबईत आलेल्या १९ वर्षीय साहिल काझी याचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. तो आत्याकडे राहायला आला होता. रात्री तो आत्याच्या दुसऱ्या घरी झोपण्यासाठी गेला होता. पत्र्याच्या खोलीवर काहीतरी कोसळल्याचा आवाज येताच त्याच्या आत्याने बाहेर धाव घेतली. त्याचवेळी भाचा ढिगाऱ्याखाली गाडला गेल्याचे पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
Baramati Crime : लग्न ठरलेल्या प्रियकराशी गोळी घेऊन संबंध, बारामतीत तरुणीचा गूढ मृत्यू, मैत्रिणीच्या हवाल्याने आईचा मोठा आरोपपावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका असल्याने येथील अनेक रहिवासी तीन महिन्यांसाठी इतरत्र राहायला जातात. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी अनेकांचे पोट हातावर होते. काही जण दोन ते तीन हजार रुपये भाडे देऊन राहत होते, तर काहींनी काळजीपोटी दुसरीकडेही छोटी खोली घेतली होती.

