Find the Fake Blind Person in 60 Seconds This Puzzle Is Tricking Everyone | एका छोट्याशा चुकीवरून शोधा, चौघांपैकी अंध असल्याचं नाटक करणारी व्यक्ती कोण? ९० टक्के लोक म्हणताहेत C
Find the Fake Blind Person in 60 Seconds This Puzzle Is Tricking Everyone | एका छोट्याशा चुकीवरून शोधा, चौघांपैकी अंध असल्याचं नाटक करणारी व्यक्ती कोण? ९० टक्के लोक म्हणताहेत C
IQ Test Puzzle: चित्र नीट निरखून पाहा आणि सांगा, चौघांपैकी अंध असल्याचं नाटक कोण करत आहे? पाहूया, तुमच्यापैकी कोण एका मिनिटाच्या आत हे कोडं सोडवून दाखवतो.
(फोटो सौजन्य – itz.kaleem017/Instagram)
पाहूया, तुमच्यापैकी कोण किती हुशार आहे. तर कोडं असं आहे. तुमच्यासमोर A, B, C आणि D अशी चार व्यक्ती आहेत. हे चौघेही जण अंध असल्याचं सांगत आहेत. पण खरं तर या चौघांपैकी एक व्यक्ती अंध असल्याचं नाटक करत आहे. ती व्यक्ती कोण? हे तुम्ही एका मिनिटाच्या आत शोधून दाखवा. चला पाहूया, तुमच्यापैकी कोणाला हे कोडं सोडवण्यात यश मिळतं.
काय असेल उत्तर बरं?
या कोड्याचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला चौघांनाही नीट पाहावं लागेल. कारण डोळस व्यक्तीनं एक छोटीशी चूक केली आहे. ती चूक जर तुमच्या लक्षात आली, तर तुम्ही लगेचच या कोड्याचं उत्तर शोधू शकाल.
0 0 0 0 0
बराच वेळ विचार करूनही जर तुम्ही थकला असाल, तर खाली दिलेलं चित्र पाहा. त्यामध्ये तुम्हाला योग्य उत्तर सापडेल.
हे आहे योग्य उत्तर
उत्तर आहे C. कारण तो एकमेव व्यक्ती आहे, ज्याच्या हातात तुम्हाला घड्याळ दिसतं. बाकी कोणाच्याही हातात तुम्हाला घड्याळ दिसणार नाही. (फोटो सौजन्य – itz.kaleem017/Instagram)
लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.
डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.
महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.
क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.
शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.… आणखी वाचा