EPF Interest Rate: एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजे EPFO सदस्यांच्या खात्यात आर्थिक वर्ष 2025-26 साठी बुधवार, 15 जुलै 2206 व्याज जमा केले जाणार आहे. व्याजाची गणना दरमहा शिल्लक रकमेच्या आधारे केली जात असली, तरी सरकारकडून व्याजाचा दर जाहीर झाल्यानंतर वर्षातून एकदाच EPF खात्यांमध्ये जमा केले जाते.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलेले की निवृत्ती वेतन निधी संस्था सुमारे 34 कोटी सदस्य खात्यांमध्ये 1.44 लाख कोटी रुपयांहून अधिक व्याजाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया करत आहे आणि 15 जुलै 2026 पर्यंत अपडेटेड शिल्लक रक्कम खात्यांमध्ये दिसण्याची अपेक्षा आहे.
तुमचा UAN सक्रिय असेल तर UAN-नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 7738299899 या क्रमांकावर SMS पाठवून EPFO कडील नवीन PF योगदान आणि शिल्लक रक्कम तपासू शकतात.
‘EPFOHO UAN’ या फॉरमॅटमध्ये तुमच्या UAN-नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून एसएमएस पाठवा. यामध्ये तुमचा UAN क्रमांक नक्की नमूद करा. तुम्हाला प्रादेशिक भाषेत प्रतिसाद हवा असेल, तर संदेशात UAN नंतर तुमच्या पसंतीच्या भाषेचा कोड जोडा. ही सुविधा 10 भाषांमध्ये उपलब्ध असून तुम्ही – इंग्रजी (डीफॉल्ट), हिंदी (HIN), पंजाबी (PUN), गुजराती (GUJ), मराठी (MAR), कन्नड (KAN), तेलगू (TEL), तमिळ (TAM), मल्याळम (MAL) आणि बंगाली (BEN) यापैकी भाषा निवडू शकता.
UMANG ॲप वापरून EPF शिल्लक कशी तपासायची
सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून UMANG ॲप डाउनलोड करा. ॲप इन्स्टॉल केल्यावर लॉग इन करा आणि EPFO सेवांचा लाभ घेण्यासाठी तुमचा UAN लिंक करा, त्यांनतर तुम्ही UMANG ॲपद्वारे सहजपणे तुमची पीएफ शिल्लक पाहू शकता, योगदानांचा मागोवा घेऊ शकता आणि क्लेम देखील दाखल करू शकता. वापरकर्ते PF पेन्शन खात्यातील गेल्या 3 महिन्यांच्या व्यवहारांचा तपशील पाहू शकतात आणि उर्वरित माहिती PDF स्वरूपात डाउनलोड करू शकतात.
लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.
मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.
पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.
2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.
शैक्षणिक पात्रता
प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.… आणखी वाचा