Headlines

DJ Lavani Restrictions: लावणीसाठी योग्यता प्रमाणपत्र बंधनकारक; अश्लीलता, आक्षेपार्ह कार्यक्रम रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचा निर्णय – suitability certificate mandatory for lavani performances cultural affairs dept decision to curb obscenity and objectionable content


DJ lavani eligibility certificate: सध्या अनेक ठिकाणी लावणीच्या नावाने अश्लाघ्य गाणी आणि बिभत्स नृत्याचे प्रकार घडत आहेत. या कार्यक्रमांचे रील समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत.

Anderson Phillip Catch - 2026-08-18T123203
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे: लावणी आणि इतर लोककलांच्या नावाखाली होणाऱ्या अश्लील आणि आक्षेपार्ह कार्यक्रमांना आळा घालण्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाने या कार्यक्रमांसाठी योग्यता प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. सार्वजनिक ठिकाणी नाटक, एकांकिका, लोकनाट्य, तमाशा, लावणी, लोकसंगीत, वग, मेळे आदी कार्यक्रम सादर करण्यापूर्वी त्यांच्या संहिता, निवेदन किंवा सारांशाची तपासणी करून मंडळाचे योग्यता प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असेल.

रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाचे सचिव सं. पुं. खामकर यांनी याबाबतचा आदेश दिला आहे. राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी सांस्कृतिक कार्य विभागाला याबाबत निवेदन दिले होते.

Maharashtra TimesMumbai News : आधी बाबा गेले, आता आई! लेकीच्या धाडसी निर्णयाला नातेवाईकांची साथ, माऊलीच्या पार्थिवाला मुखाग्नी, भांडुपवासियांचे डोळे पाणावलेलोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली सुरू असलेल्या अश्लील डीजे लावणी आणि आक्षेपार्ह कार्यक्रमांवर नियंत्रण आणण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाने केली होती. त्यानुसार मंडळाने योग्यता प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले आहे. प्रमाणपत्र असल्याची खातरजमा केल्यानंतरच कार्यक्रमांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्याबाबत आपल्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या स्तरावरून सूचना द्याव्यात, असे मंडळाच्या वतीने पोलिस महासंचालकांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

Maharashtra TimesTukaram Mundhe : एफडीएच्या कारवाईवेळी तुम्हाला कोणी लाच देण्याचा प्रयत्न केला का? तुकाराम मुंढेंचं नकारार्थी उत्तर, लाचखोरांना मोलाचा सल्ला‘पारंपरिक लावणीच्या नावाखाली अश्लील डीजे संगीत, आक्षेपार्ह नृत्यप्रकार आणि अश्लील आशयाचे कार्यक्रम सादर होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या निर्णयामुळे अशा कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला असून, पारंपरिक लावणी, लोककला आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपण्यास मदत होणार आहे’, असे पाटील यांनी सांगितले.

लावणीमध्ये पारंपरिक वाद्यांचा वापर करून कला सादर करणे अपेक्षित आहे. प्रमाणित संहिता, निवेदन किंवा सारांशापेक्षा वेगळा अश्लील अथवा आक्षेपार्ह भाग कार्यक्रमात आढळल्यास किंवा तक्रार प्राप्त झाल्यास कारवाई करण्यात येईल. – सं. पुं. खामकर, सचिव, रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळ

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा