Headlines

Divya Suresh : लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मध्यरात्री घडला भयंकर प्रकार, रस्त्यावरील माणसानं केलं आक्षेपार्ह कृत्य; सांगितली आपबिती


Divya Suresh : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री दिव्या सुरेश आणि तिची बहीण यांच्यासोबत बंगळूरमध्ये भयानक प्रकार घडला. त्याबद्दल अभिनेत्रीनं सांगितलं आहे.

Divya Suresh And Her Sister Faces Harassment
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री आणि ‘बिग बॉस कन्नड’ची स्पर्धक दिव्या सुरेशनं एक धक्कादायक दावा केला आहे. ३३ वर्षीय अभिनेत्रीनं आरोप केला आहे की, रविवारी रात्री उशिरा ती आणि तिची बहीण बंगळूरुमध्ये घरी येत असताना, एका अनोळखी व्यक्तीनं त्यांचा पाठलाग केला, त्यांच्यासोबत आक्षेपार्ह वर्तन केलं आणि त्यांचा छळ केला. सोशल मीडियावर आपला हा भयानक अनुभव सांगताना, अभिनेत्रीनं शहरातील महिलांच्या सुरक्षेबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. २०१७ मध्ये ‘मिस इंडिया साऊथ’चा किताब जिंकलेल्या दिव्या सुरेशनं दावा केला आहे की, ही घटना रात्री ११:३० च्या सुमारास घडली.

Smita Tambe : सिनेमा, मातृभाषेवरचं प्रेम ते लेकीला दिलेली शिकवण, स्मिता तांबेसोबत खास गप्पा

दिव्या सुरेशनं सांगितला प्रसंग

दिव्या सुरेशनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरील पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘मी आणि माझी बहीण रात्री साधारण ११:३० वाजता आमच्या गाडीकडे जात होतो, तेव्हा एक माणूस आमचा पाठलाग करू लागला. पाठलाग करताना तो उघडपणे त्याच्या गुप्तांगांना स्पर्श करत होता. आम्ही त्याला लगेच थांबवलं, पण तो थांबला नाही. आम्ही आमच्या गाडीत बसेपर्यंत त्यानं ते सुरूच ठेवलं.’
Maharashtra TimesAnuj Prabhu : ‘खूप नर्व्हस होतो, राज ठाकरे आणि आनंद दिघेंचं राजकारणाव्यतिरिक्त नातं दाखवायचं होतं’, अनुज प्रभूनं सांगितला ‘धर्मवीर’ सिनेमाचा किस्सा
दिव्या सुरेश बंगळूर पोलिसांना टॅग करत म्हणाली की, ‘आम्हाला जे सुरक्षेचं आश्वासन दिलं जातं, ते कुठे आहे?’ दिव्याने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या घटनेचा एक व्हिडिओ देखील शेअर केला होता, जो स्टोरीसाठी असलेल्या २४ तासांच्या मुदतीनंतर आता उपलब्ध नाही.

Divya Suresh Post

बिग बॉसमधून अभिनेत्रीला लोकप्रियता मिळाली

दरम्यान, दिव्या सुरेशला २०२१ मध्ये ‘बिग बॉस कन्नड सीझन ८’ या शोमधून लोकप्रियता मिळाली. ती ‘नन्ना हेंधती एमबीबीएस’ आणि ‘जोडी हक्की’ या कन्नड टीव्ही मालिकांसाठीही ओळखली जाते. अभिनयात येण्यापूर्वी ती एक मॉडेल होती आणि २०१७ मध्ये तिनं ‘मिस इंडिया साऊथ’ हा किताब जिंकला होता. त्याच वर्षी तिनं ‘#९ हिल्टन क्रॉस’ या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं. त्यानंतर ती ‘रॉडी बेबी’, ‘केम्पू हळदी हसिरू’ आणि ‘हिरण्य’ यांसारख्या कन्नड चित्रपटांमध्ये दिसली आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा