CJP entry into politics abhijit dipke and saurabh das make important revelations; CJP राजकारणात उतरणार का? अभिजीत दीपके यांनी स्पष्टच सांगितलं; झारखंड आंदोलनावरही भूमिका जाहीर
CJP entry into politics abhijit dipke and saurabh das make important revelations; CJP राजकारणात उतरणार का? अभिजीत दीपके यांनी स्पष्टच सांगितलं; झारखंड आंदोलनावरही भूमिका जाहीर
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: कॉक्रोच जनता पार्टी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करणार का? या प्रश्नावर संघटनेचे संस्थापक अभिजीत दीपके आणि प्रवक्ते सौरभ दास यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. “सध्या आमची राजकारणात जाण्याची कोणतीही इच्छा नाही, मात्र माध्यमांनाच याची जास्त उत्सुकता आहे,” असा थेट टोला मारत दीपके यांनी सध्याच्या राजकीय पक्षांच्या दुरवस्थेवर आणि पक्षांतरावर घणाघाती टीका केली.
माध्यमांशी संवाद साधताना अभिजीत दीपके म्हणाले की, “देशात आज राजकीय पक्षांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. सकाळी एक आमदार किंवा खासदार एका पक्षात असतो आणि संध्याकाळी थेट दुसऱ्या पक्षात दिसतो. ED आणि CBI सारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर करून राजकीय पक्ष फोडले जात आहेत. अशा वेळी लोकशाही वाचवण्यासाठी राजकीय पक्ष सोडून सर्वसामान्यांनी आणि संघटनांनी एकत्र येणे गरजेचे आहे.”
झारखंड आंदोलनाला पाठिंबा; ‘E20’ आणि बेरोजगारीवर मंथन
CJP चा पुढचा रोडमॅप काय असेल आणि देशभरात संघटन कसे वाढवले जाईल, यावर छत्रपती संभाजीनगरमधील बैठकीत चर्चा सुरू असल्याचे दीपके यांनी सांगितले. झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाला CJP ने पूर्ण पाठिंबा जाहीर केला असून, त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी CJP ची टीम झारखंडला जाणार आहे. याशिवाय बेरोजगारी, मीडियाचे स्वातंत्र्य, न्यायपालिका आणि E20 इंधनाचा मुद्दा यावर बैठकीत सविस्तर मंथन केले जात आहे.
सरकारसोबत बोलणी सुरू; गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया
CJP चे प्रवक्ते सौरभ दास यांनी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केला. “ज्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठ्या-काठ्या आणि पॅलेट गन चालवल्या, अशा जखमी विद्यार्थ्यांना आम्ही पहिल्या दिवसापासून वैद्यकीय आणि कायदेशीर मदत पुरवत आहोत. फक्त दिल्लीतच नाही तर देशभरातील आंदोलकांचे मुद्दे आम्ही उचलत आहोत,” असे दास म्हणाले. तसेच, “आमचा सरकारच्या प्रतिनिधींशी सतत संवाद सुरू असून, त्याच्या सकारात्मक परिणाम म्हणून अनेक विद्यार्थ्यांवरील एफआयआर मागे घेण्यात आले आहेत. उर्वरित गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. लहान मुलांविरोधात भाजप-आरएसएस समर्थकांनी चालवलेल्या ट्रोलिंगवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. CJP ची पुढील अधिकृत भूमिका पुढच्या पत्रकार परिषदेत मांडली जाणार आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा