Headlines

CJP Abhijeet Dipke यांच्या परदेशातील शिक्षणावर प्रश्न, वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी



NEET पेपर लीक प्रकरणाविरोधात देशभरात उठलेला आवाज आणि कॉकरोच जनता पार्टी’नं उठवलेलं रान यामुळे एक झेन जीची चळवळच उभी राहिली. सोशल मीडियावरील एका व्यंगात्मक अकाऊंटनं सुरू झालेली ही संघटना आणि त्याचा कर्ता करविता अभिजीत दीपके अचानक देशातील राजकारणाच्या आणि प्रसारमाध्यमांच्या केंद्रस्थानी आला. पण आता हे प्रकरण केवळ विद्यार्थ्यांचे आंदोलन किंवा सोशल मीडिया कॅम्पेनपुरते मर्यादित राहिलेले नाही. या आंदोलनानंतर या संघटनेचे नाव, तिचे आर्थिक व्यवहार, अभिजीत दीपके यांचे शिक्षण आणि थेट त्यांच्या वडिलांच्या संपत्तीवरच अनेक गंभीर कायदेशीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुरतचे प्रसिद्ध आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी याप्रकरणी निवडणूक आयोग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि कर प्राधिकरणांकडे विविध तक्रारी दाखल केल्या आहेत. हे अमित तिवारी नक्की कोण आहेत? त्यांनी अभिजीत दीपके यांच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी का मागितली आहे? शिक्षणाच्या खर्चावर अभिजीत दीपके यांनी काय स्पष्टीकरण दिले? हे संपूर्ण प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया..



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत