Headlines

Chhatrapati Sambhajinagar Yes Fine Bakery Tukaram Mundhe FDA Raid Bakery License Cancel; टोस्ट बनवताना शेजारी शौचालय, तंबाखूच्या पिचकाऱ्या, ‘येस फाईन बेकरी’वर छापा; आतापर्यंतचा सर्वात मोठा कारनामा उघड


Chhatrapati Sambhajinagar Yes Fine Bakery License Cancelled : एफडीएच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा बेकरीत प्रवेश केला, तेव्हा तिथे अत्यंत विदारक आणि किळसवाणं दृश्य समोर दिसलं. ज्याठिकाणी टोस्ट तयार केले जात होते, तो संपूर्ण परिसर गंज, धूळ आणि जळमटांनी माखलेला होता.

Chhatrapati Sambhajinagar Yes Fine Bakery License Cancelled
संभाजीनगर येस फाईन बेकरी परवाना रद्द(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि अत्यंत अस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थांची निर्मिती करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने आपला मोर्चा वळवला आहे. राज्यभरात राबवल्या जात असलेल्या विशेष अन्न सुरक्षा मोहिमेअंतर्गत, छत्रपती संभाजीनगर महापालिका झोन-3 मधील जुना बायजीपुरा, इंदिरानगर येथील ‘येस फाईन बेकरी’ वर एफडीएच्या पथकानं अचानक धाड टाकली. या कारवाईत थेट उघड्यावर अस्वच्छतेचं साम्राज्य, ग्राहकांची उघडपणे केली जाणारी फसवणूक आणि नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचं निष्पन्न झालं. सार्वजनिक आरोग्याचा मोठा धोका लक्षात घेता प्रशासनानं बेकरीचा अन्न सुरक्षा परवाना तातडीने निलंबित केला आहे.

दरवाजा नसलेलं शौचालय अन्

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा बेकरीत प्रवेश केला, तेव्हा तिथे अत्यंत विदारक आणि किळसवाणं दृश्य समोर दिसलं. ज्याठिकाणी टोस्ट तयार केले जात होते, तो संपूर्ण परिसर गंज, धूळ आणि जळमटांनी माखलेला होता. सर्वात धक्कादायक म्हणजे, अन्नपदार्थ उत्पादनाच्या जागेतच दरवाजा नसलेलं अत्यंत घाणेरडं शौचालय आढळून आलं. कामगारांना हात धुण्यासाठी वॉश बेसिन किंवा साबणाची कोणतीही सोय नव्हती. इतकेच नाही तर ज्याठिकाणी बेकरी पदार्थ बनवले जात होते, तिथे कामगार थेट तंबाखू खात असल्याचे पथकाला रंगेहात आढळले.

Maharashtra Timesछ.संभाजीनगरमधील प्रसिद्ध ‘उत्तम उपहार गृह’वर FDAचा छापा, हॉटेलात पाय टाकताच नको ते दिसलं, तुकाराम मुंढेंचा आदेश अन् परवाना रद्द

ड्रेनेज-माशांचा वावर अन् जंतूसंसर्गाचा मोठा धोका

बेकरीच्या खिडक्यांना जाळ्या नसल्यानं माशा, कीटक आणि धूळ थेट अन्नात जात होती. टोस्ट बनवल्यानंतर उरलेले वेस्टेज साहित्य आणि निकृष्ट कचरा त्याच परिसरात उघड्यावर टाकून दिलेला होता, ज्यामुळे अन्नामध्ये जंतूसंसर्ग होण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता. बेकरी पदार्थांसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाक्या आतून-बाहेरून कमालीच्या अस्वच्छ होत्या आणि त्यांच्या स्वच्छतेबाबत कोणतीही नोंद ठेवलेली नव्हती. अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणालीचे नियम पूर्णपणे बासनात गुंडाळून येथे उत्पादन सुरू होते.

दुसऱ्याच कंपनीचे खोटे लेबल मारून ग्राहकांची फसवणूक

अस्वच्छतेसोबतच या बेकरीत ग्राहकांच्या फसवणुकीचा मोठा कारनामा उघडकीस आला आहे. तपासणीदरम्यान ‘बिगबाईट 20-20 टोस्टेड ब्रेड’ नावाच्या टोस्टच्या पाकिटांवर स्वतःच्या बेकरीऐवजी ‘गार्डन बेकर्स, बायजीपुरा’ या दुसऱ्याच कंपनीचा नाव-पत्ता आणि परवाना क्रमांक छापून विक्री केली जात होती. तसेच पॅकेटवर बॅच नंबर आणि वापराची मुदत नमुद न करता केवळ पॅकिंगची तारीख टाकली होती. साखरेच्या वापराबाबतही लेबलवर दिशाभूल करणारी माहिती दिलेली आढळली.

Maharashtra TimesPune Crime : पुण्यात पुन्हा गोळीबार! वनराज आंदेकर प्रकरणातील मुख्य साक्षीदाराला संपवण्याचा प्रयत्न, तीनवेळा गोळ्या झाडल्या

परवाना तातडीने निलंबित

कोणताही तांत्रिक सल्लागार न ठेवता आणि भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास माल परत मागवण्याची कोणतीही सोय नसताना हा बेकायदेशीर उद्योग सुरू होता. या संपूर्ण प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाल्यानं अन्न व औषध प्रशासनाने या बेकरीचा परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे. या धडक कारवाईमुळे शहरातील इतर अस्वच्छ बेकरी चालकांचं चांगलेच धाबे दणाणले आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा