Headlines

40 हजारांच्या बजेटमध्ये दमदार 50MP कॅमेरा, तगडे फीचर्स; Tecno Camon 50 Ultra 5G वर मिळतोय विशेष डिस्काउंट । Maharashtra Times


भारतीय मोबाईल बाजारात टेक्नो कंपनीने आपला नवीन फोन म्हणजेच Tecno Camon 50 Ultra 5G हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी सादर केला आहे. 40,000 रुपयांपेक्षा कमी बजेट असलेल्या या फोनमध्ये खास अंडरवॉटर फोटोग्राफी तंत्रज्ञान देण्यात आले आहे. सध्या कंपनीकडून मर्यादित कालावधीसाठी या फोनवर तब्बल 3,000 रुपयांची आकर्षक सवलत दिली जात आहे. चला तर मग जाणून घेऊया.

Tecno Camon 50 Ultra 5G। Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
तुम्ही दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि उत्कृष्ट कॅमेरा असलेला फोन शोधत असाल, तर Tecno Camon 50 Ultra 5G सर्वोत्तम पर्याय आहे. या स्मार्टफोनमध्ये 6500mAh ची प्रचंड बॅटरी आणि अप्रतिम कॅमेरा फीचर्स मिळतात. लॉन्चिंग ऑफर अंतर्गत ग्राहक या प्रीमियम 5G फोनवर विशेष डिस्काउंटचा थेट फायदा उठवू शकतात.

टेक्नोचा नवीन स्मार्टफोन Tecno Camon 50 Ultra 5G ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला आहे. हा फोन तुम्हाला ॲमेझॉनवर मिळेल. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन 2 मीटर खोलीत 30 मिनिटांसाठी वॉटर रेझिस्टन्सला सपोर्ट करतो, फोनला धूळ आणि वॉटर रेझिस्टन्ससाठी IP68, IP66, IP69 आणि IP69K रेटिंग्ज देखील मिळाली आहेत. या फोनमध्ये ऑटो झूम, एआय आर्ट गॅलरी, 70 एमएम नॅचरल पोर्ट्रेट शॉट्स, अंडरवॉटर फोटोग्राफी आणि एआय ट्रॅव्हल शॉट्स यासारखे खास फीचर्स मिळणार आहेत.

IP68, IP66, IP69 आणि IP69K रेटिंग्ज

टेक्नोचा नवीन स्मार्टफोन Tecno Camon 50 Ultra 5G ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला आहे. हा फोन तुम्हाला ॲमेझॉनवर मिळेल. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन 2 मीटर खोलीत 30 मिनिटांसाठी वॉटर रेझिस्टन्सला सपोर्ट करतो, फोनला धूळ आणि वॉटर रेझिस्टन्ससाठी IP68, IP66, IP69 आणि IP69K रेटिंग्ज देखील मिळाली आहेत. या फोनमध्ये ऑटो झूम, एआय आर्ट गॅलरी, 70 एमएम नॅचरल पोर्ट्रेट शॉट्स, अंडरवॉटर फोटोग्राफी आणि AI ट्रॅव्हल शॉट्स यासारखे खास फीचर्स मिळणार आहेत.

कोणत्या स्मार्टफोनसोबत स्पर्धा

या किंमतीत टेक्नोचा हा फोन POCO X8 Pro, OnePlus Nord CE6, Realme GT 7T, MOTOROLA Edge 70 Fusion, Vivo T5 Pro 5G, OPPO F33 Pro 5G आणि Samsung A36 5G सारख्या स्मार्टफोनना टक्कर देईल.

Tecno Camon 50 Ultra 5G फीचर्स

  • डिस्प्ले: फोनमध्ये 144 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 6.78 इंचाचा डिस्प्ले आहे. हा फोन स्क्रीन प्रोटेक्शनसाठी 1.5K ProXDR कर्व्ड AMOLED डिस्प्ले आणि ड्युअल कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i सह येतो. याशिवाय या लेटेस्ट टेक्नो मोबाइलमध्ये तुम्हाला 2800 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट मिळेल.
  • प्रोसेसर: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या हँडसेटमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7400 अल्टिमेट चिपसेट देण्यात आला आहे.
  • बॅटरी: या डिव्हाइसमध्ये 45 W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6500 mAh ची बॅटरी आहे.
  • कॅमेरा: मागील बाजूस 50MP Sony LYTIA 700C सेन्सर आहे, या फोनमध्ये 5x सुपर झूम स्नॅप कॅप्चर मिळते. यात 50MP 3x टेलिफोटो सेन्सर, 8MP अल्ट्रा वाइड आणि मॅक्रो लेन्स आहे. फोनमध्ये 100x सुपरझूम सपोर्ट करण्यात आला आहे, फ्रंटमध्ये 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. दोन्ही कॅमेरे (फ्रंट आणि रिअर) 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात.
शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा