Headlines

5 मिनिटांत मोबाईलवर गॅस-आधार लिंक करा; नाहीतर सबसिडी होऊ शकते बंद! Indane, BharatGas आणि HP ची सोपी डिजिटल पद्धत । Maharashtra Times


ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. गॅस सबसिडी चालू ठेवण्यासाठी आधार लिंक करणे आवश्यक आहे. आता गॅस एजन्सीच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही; तुम्ही ‘IndianOil One’ किंवा ‘Hello BPCL’ सारख्या मोबाईल ॲप्सवरील Face Authentication चा वापर करून घरबसल्या केवळ 4 मिनिटांत ‘डिजिटल E-KYC पूर्ण करू शकता. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

Lpg Cylinder । Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहून, MyLPG अधिकृत वेब पोर्टल आणि सुरक्षित बायोमेट्रिक / OTP तंत्रज्ञानाच्या मदतीने इंडेन, भारतगॅस आणि एचपी गॅसचे ग्राहक आपले बँक खाते आणि गॅस कनेक्शन कसे सुरक्षितपणे लिंक करू शकतात, याची संपूर्ण प्रोसेस या बातमीत पुढे जाणून घेऊया.

गॅस सबसिडीचा थेट लाभ मिळवण्यासाठी ग्राहकांना आपले गॅस कनेक्शन आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर तुमचे गॅस कनेक्शन Indane, BharatGas किंवा HP Gas पैकी कोणत्याही कंपनीचे असेल, तर तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घरबसल्या अत्यंत सोप्या पद्धतीने हे काम पूर्ण करू शकता.

स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून ही प्रक्रिया डिजिटल कशी करावी, याचा सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे,

1. ‘MyLPG.in’ अधिकृत पोर्टलद्वारे ऑनलाईन लिंकिंग

  • हा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
  • सर्वप्रथम MyLPG अधिकृत पोर्टलवर जा.
  • स्क्रीनवर डाव्या बाजूला Indane, BharatGas आणि HP Gas चे तीन सिलिंडर दिसतील. तुमच्या गॅस कंपनीच्या सिलिंडरवर क्लिक करा.
  • नवीन पेज उघडल्यावर ‘Link Aadhaar’ किंवा ‘Join Direct Benefit Transfer (DBTL)’ हा पर्याय निवडा.
  • तुमचा 17 अंकी एलपीजी आयडी (LPG ID) आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका.
  • त्यानंतर तुमचा आधार नंबर प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
  • तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर एक OTP (वन टाईम पासवर्ड) येईल. तो सबमिट करताच तुमची डिजिटल लिंक पूर्ण होईल. (REF.)

2. गॅस कंपन्यांच्या मोबाईल ॲप्सचा वापर

  • तुम्हाला कॉम्प्युटर न वापरता मोबाईलवरून करायचे असेल, तर कंपन्यांनी त्यांचे अधिकृत ॲप्स उपलब्ध करून दिले आहेत.
  • Indane युझर्ससाठी ‘IndianOil One’ ॲप, BharatGas साठी ‘Hello BPCL’ ॲप आणि HP साठी ‘HP Pay’ ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करा.
  • e-KYC: ॲपमध्ये लॉगिन करून ‘Link Aadhaar’ या पर्यायावर जा. सध्या अनेक ॲप्समध्ये Face Authentication चे नवीन टेक फीचर आले आहे. यासाठी मोबाईलच्या फ्रंट कॅमेऱ्याचा वापर करून बायोमेट्रिक डेटा सुरक्षितपणे अपलोड केला जातो. (REF.)

3. IVRS द्वारे फोनवरून लिंकिंग

  • तुमच्याकडे इंटरनेट नसेल किंवा साधा की-पॅड मोबाईल असेल, तर तुम्ही केवळ एक कॉल करून आधार लिंक करू शकता:
  • केंद्र सरकारच्या तेल आणि गॅस मंत्रालयाने यासाठी एक राष्ट्रीय टोल-फ्री नंबर 1800-2333-555 जारी केला आहे.
  • या नंबरवर कॉल केल्यानंतर कॉम्प्युटराईज्ड आवाजाच्या (IVRS) सूचनांचे पालन करा.
  • तुमचा गॅस ग्राहक क्रमांक आणि विचारल्यावर आधार क्रमांक टाईप करा.

4. SMS द्वारे झटपट जोडणी

  • तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून एक एसएमएस पाठवून देखील हे काम करू शकता.
  • Indane: ‘IOC ‘ टाईप करून तुमच्या प्रादेशिक कस्टमर केअर नंबरवर पाठवा.
  • HP Gas: ‘HPGE ‘ टाईप करून अधिकृत नंबरवर पाठवा.
  • BharatGas: ‘BPC ‘ टाईप करून पाठवा.

सुरक्षिततेसाठी नेहमी अधिकृत पोर्टल किंवा ॲप्सचाच वापर करा. बँक खाते आणि गॅस सबसिडी थेट सुरक्षित बँक खात्यात येण्यासाठी (DBT) तुमचे बँक खाते देखील आधारशी लिंक असणे गरजेचे आहे.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा