Headlines

पूर्णवेळ अभियंता अन् 8 तास वीजेसाठी शेतकरी आक्रमक:मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार‎




काही दिवसांपासून महावितरणकडून शेतीसाठी होणारा वीजपुरवठा अत्यंत अनियमित होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून महावितरणच्या सात्रळ सबस्टेशनच्या आवारात किरण कडू यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालू राहणार असल्याचे सांगितले. आंदोलक शेतकरी तसेच ग्रामस्थांनी मागण्यांचे निवेदन डेप्युटी इंजिनियर पाटील तसेच सब स्टेशनचे सब इंजिनियर दिलीप गाढे यांना दिले. सात्रळ सबस्टेशनला तात्काळ पूर्णवेळ अभियंता नियुक्त करावा, शेतीसाठी सलग आठ तास वीजपुरवठा द्यावा, सात्रळ सबस्टेशनचे कार्यालय गावात स्थलांतरित करावे, आठवड्यातून एकदाच नियोजित देखभालीसाठी वीजपुरवठा खंडित करावा; त्याच कारणासाठी वारंवार वीजपुरवठा बंद करू नये, सर्व भागात पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा, शेतीसाठी आठ तास वीज मिळत नसेल तर यापुढे पंचक्रोशीतील ग्रामस्थ घरगुती लाइट बिल भरणार नाही. यासाठी महावितरणला कुठलेही सहकार्य ग्रामस्थ करणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. अंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून समर्पक उत्तर न मिळाल्याने आंदोलन चालूच राहणार असल्याचे समजते. या आंदोलनात किरण अंत्रे, बलराज पाटील, बाळासाहेब डुकरे, अमोल दिघे, अवधूत चोरमुंगे, परशराम साबळे, नंदू कडू, बापू दिघे, संभाजी कडू, हर्षल कडू आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत