Headlines

तुकाराम मुंढेच्या म्हणण्यानुसार 1 किलो पनीर बनवायलाच ₹350+ खर्च मग स्वस्तात काय खाताय? समजा साधं गणित घरीच तयार करा – fda commissioner tukaram mundhe explain real paneer price know how to make panner at home


आज बाजारात पनीर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या किमतीत मिळते. काही ठिकाणी 200 ते 250 रुपये किलो तर काही ठिकाणी त्याहूनही कमी दरात पनीर विकले जाते. मात्र, अन्नसुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो एवढ्या कमी किमतीत मिळणारे पनीर खरोखर शुद्ध आहे का? अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पनीरच्या गुणवत्तेबाबत बोलताना ग्राहकांना साधे गणित समजावून सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, शुद्ध दूध वापरून 1 किलो पनीर तयार करण्यासाठी लागणारा खर्चच जास्त आहे. मग बाजारात अत्यंत स्वस्त दरात मिळणारे पनीर कोणत्या प्रकारचे आहे, हा प्रश्न ग्राहकांनी विचारला पाहिजे.

Paneer Adulteration and Food Safety
फोटो सौजन्य :- @iStock
आज बाजारात पनीर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या किमतीत मिळते. काही ठिकाणी 200 ते 250 रुपये किलो तर काही ठिकाणी त्याहूनही कमी दरात पनीर विकले जाते. मात्र, अन्नसुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो .एवढ्या कमी किमतीत मिळणारे पनीर खरोखर शुद्ध आहे का? अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त Tukaram Mundhe यांनी पनीरच्या गुणवत्तेबाबत बोलताना ग्राहकांना साधे गणित समजावून सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, शुद्ध दूध वापरून 1 किलो पनीर तयार करण्यासाठी लागणारा खर्चच मोठा असतो. मग बाजारात अत्यंत स्वस्त दरात मिळणारे पनीर कोणत्या प्रकारचे आहे, हा प्रश्न ग्राहकांनी विचारला पाहिजे.पनीर हा दूधापासून तयार होणारा दुग्धजन्य पदार्थ आहे. चांगल्या प्रतीचे पनीर तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दूध लागते. साधारणपणे 1 किलो पनीर बनवण्यासाठी 5 ते 6 लिटर दूध आवश्यक असते. जर दुधाची किंमत, दूध प्रक्रिया, गॅस, वीज, कामगार, पॅकिंग आणि वाहतुकीचा खर्च लक्षात घेतला तर शुद्ध पनीरची उत्पादन किंमत सहजपणे वाढते.

म्हणूनच बाजारात मिळणाऱ्या अत्यंत स्वस्त पनीरकडे ग्राहकांनी केवळ “स्वस्त मिळत आहे” या दृष्टीने पाहू नये. कारण कमी किमतीत उत्पादन विकायचे असेल तर त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतात. काही वेळा भेसळयुक्त किंवा कमी दर्जाच्या पदार्थांचा वापर करून उत्पादनाचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पनीरमध्ये भेसळ असल्यास त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आरोग्याबाबत काळजी घेणाऱ्या लोकांनी पनीर खरेदी करताना अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. दिसायला पांढरे आणि आकर्षक असलेले प्रत्येक पनीर शुद्ध असेलच असे नाही. (फोटो सौजन्य :- @iStock, @tukaram_ias)

1 किलो पनीरसाठी किती दूध लागते?

1 किलो पनीरसाठी किती दूध लागते?

पनीर बनवण्यासाठी मुख्य घटक म्हणजे दूध. साधारणपणे 1 किलो चांगल्या प्रतीचे पनीर तयार करण्यासाठी 5 ते 6 लिटर दूध लागू शकते.
समजा बाजारात चांगल्या दर्जाचे दूध 60 ते 70 रुपये लिटर दराने मिळत असेल तर
5 लिटर दूध × 60 रुपये = 300 रुपये
6 लिटर दूध × 60 रुपये = 360 रुपये
यामध्ये दूधाचा खर्चच 300 ते 360 रुपयांच्या आसपास जातो. त्यानंतर गॅस, वीज, मनुष्यबळ, पॅकिंग, वाहतूक आणि विक्रेत्याचा खर्च धरला तर 1 किलो पनीरची वास्तविक किंमत आणखी वाढते.

मग स्वस्त पनीरमध्ये काय असते?

मग स्वस्त पनीरमध्ये काय असते?

जर एखादे पनीर खूपच कमी दरात विकले जात असेल तर ग्राहकांनी सावध राहणे गरजेचे आहे. काही वेळा अशा उत्पादनांमध्ये दुधाचे प्रमाण कमी असू शकते किंवा दर्जाहीन घटक वापरले जाऊ शकतात.बाजारात काही ठिकाणी बनावट किंवा भेसळयुक्त पनीर आढळल्याच्या घटना समोर येतात. अशा पनीरमध्ये स्टार्च, वनस्पतीजन्य चरबी किंवा इतर पदार्थ मिसळले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे फक्त कमी किंमत पाहून पनीर खरेदी करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

घरी पनीर बनवणे हा उत्तम पर्याय

घरी पनीर बनवणे हा उत्तम पर्याय

बाजारातील गुणवत्तेबाबत शंका असेल तर घरच्या घरी पनीर बनवणे हा सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. घरचे पनीर ताजे, शुद्ध आणि आपल्या नियंत्रणात असते.
साहित्य
2 लिटर फुल क्रीम दूध
2 ते 3 चमचे लिंबाचा रस किंवा व्हिनेगर
स्वच्छ कापड (मलमलचे कापड)

कृती

कृती

1. दूध उकळा
एका भांड्यात 2 लिटर दूध घेऊन ते चांगले उकळून घ्या.
2. दूधात लिंबाचा रस टाका
गॅस कमी करून त्यात हळूहळू लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घाला. दूध फाटून पाणी आणि पनीर वेगळे होईल.
3. गाळून घ्या
फाटलेले दूध स्वच्छ मलमलच्या कपड्यात गाळा. उरलेला पनीरचा भाग कपड्यात राहील.
4. पाणी काढा
कपड्याला बांधून काही वेळ टांगून ठेवा, जेणेकरून अतिरिक्त पाणी निघून जाईल.
5. आकार द्या
पनीरवर वजन ठेवून 1 ते 2 तास दाबून ठेवा. त्यानंतर चौकोनी तुकडे करून वापरता येईल.

चांगले पनीर बनवण्यासाठी टिप्स

चांगले पनीर बनवण्यासाठी टिप्स
  • जास्त चव आणि मऊपणासाठी फुल क्रीम दूध वापरा.
  • दूध फाडताना लिंबाचा रस हळूहळू घाला.
  • पनीर जास्त वेळ दाबून ठेवल्यास ते घट्ट होते; कमी वेळ ठेवल्यास ते मऊ राहते.
  • तयार पनीर पाण्यात ठेवून फ्रिजमध्ये 2–3 दिवस साठवता येते.

ग्राहकांनी पनीर घेताना काय तपासावे?

ग्राहकांनी पनीर घेताना काय तपासावे?
  • पनीर खरेदी करताना काही साध्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात
  • रंग पहा: शुद्ध पनीर साधारण पांढरे किंवा फिकट क्रीम रंगाचे असते. खूप चमकदार किंवा वेगळ्या रंगाचे पनीर टाळावे.
  • घट्टपणा तपासा: चांगल्या पनीरचा पोत मऊ पण घट्ट असतो. रबरासारखे जास्त कडक पनीर संशयास्पद असू शकते.
  • वास तपासा: ताज्या पनीरला दूधासारखा सौम्य वास असतो. विचित्र वास आल्यास वापर टाळावा.
  • विश्वासार्ह ठिकाणाहून खरेदी करा: परवानाधारक विक्रेत्याकडून पनीर घेणे सुरक्षित ठरते.
मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा