Headlines

ना अक्षर पटेल, ना शुभमन; इंग्लंडच्या पराभवासाठी भारताचे तीन खेळाडू जबाबदार, इंग्लंडचा कॅप्टन हॅरी ब्रुक काय म्हणाला?


Harry Brook News : भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या मालिकेत भारतीय संघाने ६ विकेटने विजय मिळवला होता. या सामन्यामध्ये शुभमन ८० धावा, अक्षर पटेल नाबाद ५७ आणि वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ५२ धावा केल्या. मात्र पराभवानंतर हॅरी ब्रुक काय म्हणाला जाणून घ्या.

Harry Brrok IND vs ENG
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : अक्षर पटेलची अष्टपैलू कामगिरी आणि शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदरचे संयमी अर्धशतक या जोरावर भारताने मालिकेतील पहिल्या वन-डे क्रिकेट सामन्यात इंग्लंडविरुद्ध सहा विकेटनी मात केली. या विजयासह भारताने इंग्लंड दौऱ्यातील पराभवाची मालिका खंडित केली. या सामन्यात शुभमन गिल ८० धावा करून रिटायर हर्ट झाला होता. अक्षर पटेलने चार विकेट आणि नाबाद ५७ धावा केल्या. तर वॉशिंग्टननेही नाबाद ५२ धावा करत सामना जिंकवला. पण इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुक याने सामना कुठे फिरला हे सांगितले.

पहिल्या वनडेमधील पराभवानंतर इंग्लंडच्या कर्णधाराने सांगितले की, कामगिरी फारशी चांगली नव्हती. मधल्या फळीत २० धावांत ५ विकेट गेल्यामुळे संघ दबावात आला, मात्र त्यानंतर गोलंदाजांनी चांगली लढत दिली आणि रूट आणि लियान डॉसन यांच्या भागीदारीच्या जोरावर संघ २६०पर्यंत पोहोचला. पिचनंतर थोडी स्लो झाली ज्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला ५-६च्या रनरेटने सहज सामना जिंकता आला. त्यांनी सांगितले की जर अजून काही धावा झाल्या असत्या तर स्पिनर्स मधल्या षटकांमध्ये प्रभाव टाकू शकले असते. पुढील सामन्यासाठी ते कार्डिफला जाऊन पिच बघून संघ निवडीचा निर्णय घेतील आणि अधिक ताकदीने पुनरागमन करण्याचा प्रयत्न करू, असं हॅरी ब्रुक म्हणाला. भारताकडून गुरूनूर ब्रार २, प्रसिद्ध कृष्णा २ आणि बुमराह १ यांनी घेतलेल्या पाच विकेटमुळे इंग्लंड बॅकफूटवर गेली.
Maharashtra TimesRohit Sharma Virat Kohli : बर्मिंगहॅममध्ये रो-को फ्लॉप! 6 महिन्यांनंतर मैदानात उतरुनही निराशाजनक कामगिरी; रोहित-विराट नेमके कसे आऊट झाले?
‘टी-२०’ मालिकेत अपयश आलेल्या भारताने वन-डेत साजेशी सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करून इंग्लंडचा डाव ४७.५ षटकांत गुंडाळला. यानंतर विजयी लक्ष्य ४५.२ षटकांत चार विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि विराट कोहली अपयशी ठरले. गिलने श्रेयस अय्यरसह १०३ चेंडूंत १०१ धावांची भागीदारी रचली. शतकाजवळ आल्यावर गिल पायात गोळे आल्यामुळे निवृत्त झाला. त्याने ७५ चेंडूंत ११ चौकार व एका षटकारासह ८० धावा केल्या. अक्षरने वॉशिंग्टन सुंदरसह १०५ चेंडूंत १०२ धावांची अभेद्य भागीदारी करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
Maharashtra TimesIND vs ENG 1st ODI : भारताला जिंकण्यासाठी 259 धावांचे टार्गेट, 80-5 वरून इंग्लंडचे कमबॅक, शिवम दुबेची एक चूक पडली महागात, नेमकी काय?
दरम्यान, अक्षरने ५२ चेंडूंत पाच चौकार व एका षटकारासह नाबाद ५७, तर वॉशिंग्टन सुंदरने ६३ चेंडूंत चार चौकार व एका षटकारासह नाबाद ५२ धावा केल्या. तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. लिअॅम डॉसन आणि जो रूटने इंग्लंडला अडीचशे धावांचा टप्पा ओलांडून दिला होता.