Windfall Tax: मध्यपूर्वेत अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पेट्रोल, डिझेल आणि ATF फ्युलबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पश्चिम आशियातील संघर्षाला नजीकच्या काळात विराम लागताना दिसत नाही ज्याचे पडसाद तेलाच्या बाजारावर उमटले असताना कच्च्या तेलाच्या किमतीत सतत वाढीचा कल नोंदवला जात असताना सरकारने डिझेल आणि एटीएफच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स दर वाढवला, तर पेट्रोल निर्यातीवरील कर कपात केली आहे.
गुरुवार, 16 जुलैपासून नवीन कर दर लागू झाले असून जागतिक तेल बाजारातील वेगवान चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर विंडफॉल टॅक्समध्ये नवीन बदल केला गेला आहे. सरकार प्रत्येक 15 दिवसांनी या निर्यातीलवरील विंडफॉल टॅक्स म्हणजे कर दराचा आढावा घेते.
अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार पेट्रोलवरील निर्यात शुल्क 4 रुपयांवरून 2.5 रुपये प्रति लिटरपर्यंत कमी केले गेले आहे. तसेच डिझेल निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स 8.5 रुपये प्रति लिटरवरून 15.5 रुपये प्रति लिटरपर्यंत वाढवला आणि एटीएफ निर्यातीवरील उपकर 7.5 रुपये लिटरवरून 14.5 रुपये लिटरपर्यंत वाढवला गेला आहे.
जागतिक पातळीवरील पेट्रोलियम पुरवठा साखळी आणि जहाजवाहतूक लॉजिस्टिक्सवर परिणाम करणाऱ्या पश्चिम आशियातील भू-राजकीय परिस्थितीचा हवाला देत या व्यत्ययांमुळे पुरवठ्यात असंतुलनाचा धोका वाढल्याचे सरकारने म्हटले आहे.
याशिवाय वाढत्या दरातील फरकामुळे घाऊक ग्राहकांनी आपली खरेदी निश्चित पुरवठा मार्गांवरून किरकोळ पंपांकडे वळवल्याने, किरकोळ विक्री केंद्रांवर डिझेल आणि पेट्रोलची विक्री नेहमीपेक्षा जास्त झाली असे निरीक्षण अधिकाऱ्यांनी नोंदवले.
मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळालं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी अनपेक्षितपणे संपुष्टात आल्यावर वॉशिंग्टनने तेहरानच्या तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला तर इराणकडूनही व्यापारी जहाजांवर हल्ले केले गेले ज्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर वर्चस्व मिळवण्यासाठी चढाओढ सुरू झाली.
या दरम्यान, गुरुवारी ब्रेंट क्रूड तेलाचा भाव 0.35% वाढून 85.25 डॉलर बॅरलवर पोहोचला असून अमेरिकेने इराणवर पुन्हा नौदल नाकेबंदी लादल्यामुळे होर्मुझमधून होणाऱ्या तेल पुरवठ्याबाबत चिंता वाढली आणि जगातील 20% तेलाची वाहतूक होणाऱ्या होर्मुझबद्दल अनिश्चितता निर्माण झाली.
भू-राजकीय तणाव पुन्हा निर्माण झाला असून तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यांमुळे क्रूडच्या दरवाढीला पाठिंबा मिळाला. मात्र, महागाईची चिंता आणि घटत्या जागतिक मागणीमुळे पुढील दरवाढ मर्यादित राहिली.
कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होताना दुसरीकडे, रशियाकडून होणाऱ्या निर्यातीतही घट झाली आणि पुरवठ्यातील व्यत्ययांमुळे डिझेल रिफायनिंगच्या नफ्यात वाढ झाल्याने इंधन बाजारावर दबाव आला. साठेबाजी आणि गैरवापर रोखण्यासाठी व किरकोळ ग्राहकांसाठी पुरवठा कायम ठेवण्यासाठी 11 जून रोजी सरकारने औद्योगिक, व्यावसायिक आणि संस्थात्मक ग्राहकांना पेट्रोल पंपांवरून पेट्रोल-डिझेल खरेदी करण्यावर निर्बंध घातलेले, जे 1 जुलै रोजी शिथिल केले गेले.
लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.
मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.
पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.
2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.
शैक्षणिक पात्रता
प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.… आणखी वाचा