Headlines

EPF Interest Credit Check Process; कोट्यवधी नोकरदारांची प्रतीक्षा संपली; EPFO कडून 8.25 टक्के व्याज जमा होण्यास सुरुवात; तुमच्या खात्यात पैसे आले का? पाहा कसा करायचा बॅलन्स चेक


EPF Interest Rate: एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजे EPFO सदस्यांच्या खात्यात आर्थिक वर्ष 2025-26 साठी बुधवार, 15 जुलै 2206 व्याज जमा केले जाणार आहे. व्याजाची गणना दरमहा शिल्लक रकमेच्या आधारे केली जात असली, तरी सरकारकडून व्याजाचा दर जाहीर झाल्यानंतर वर्षातून एकदाच EPF खात्यांमध्ये जमा केले जाते.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलेले की निवृत्ती वेतन निधी संस्था सुमारे 34 कोटी सदस्य खात्यांमध्ये 1.44 लाख कोटी रुपयांहून अधिक व्याजाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया करत आहे आणि 15 जुलै 2026 पर्यंत अपडेटेड शिल्लक रक्कम खात्यांमध्ये दिसण्याची अपेक्षा आहे.

Maharashtra TimesWindfall Tax Explainer: होर्मुझ संकटामुळे सरकार दबावात; पेट्रोल, डिझेल, जेट इंधनावरील केंद्र सरकारचा महत्त्वाचा नियम आजपासून लागू!

तुमच्या EPF खात्यात व्याज जमा झाले आहे की नाही?

ईपीएफओ​​द्वारे EPF खात्यातील शिल्लक रकमेवर व्याज जमा होताच तुमच्या EPF बॅलन्समध्ये दिसू लागते. खातेधारक खालील माध्यमांतून आपली EPF शिल्लक तपासू शकतात:

  • UMANG ॲप
  • ईपीएफओ मेंबर ई-सेवा पोर्टल
  • मिस्ड कॉल सेवा
  • SMS सेवा

तसेच, खात्याचा संक्षिप्त तपशील त्वरित पाहण्यासाठी सदस्य EPFO ​​मेंबर पासबुक पोर्टलवरील Passbook Lite ची सुविधाही वापरू शकतात.

Maharashtra TimesMultibagger Stock : लखपतींचे नशीब पालटणारा स्टॉक; 3 वर्षांतला परतावा पाहून गुंतवणूकदारांचे डोळे चक्रावले; कंडोम कंपनीवर वाढला विश्वास

पासबुक लाईटद्वारे EPF शिल्लक कशी तपासायची

1. सर्वप्रथम ईपीएफओच्या अधिकृत ‘मेंबर पासबुक’ पोर्टलवर जा आणि तुमचा 12-अंकी UAN ​क्रमांक, पासवर्ड व सुरक्षा कॅप्चा वापरून साइन-इन करा.

2. तुमच्या आधारशी लिंक मोबाइल क्रमांकावर OTP व्हेरिफाय करा.

3. ‘View’ वर क्लिक करा आणि तुमच्या अलीकडील EPF योगदान, पैसे काढल्याचा तपशील व शिल्लक रकमेची माहिती पाहण्यासाठी ‘Passbook Lite’ पर्याय निवडा.

Maharashtra TimesUS Tariff Threat: 500% शुल्क नको, पण 100% टॅरिफ तर द्यावाच लागेल! रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल अमेरिकेची भारतावर कारवाई

SMS द्वारे पीएफ शिल्लक कशी तपासायची

तुमचा UAN सक्रिय असेल तर UAN-नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 7738299899 या क्रमांकावर SMS पाठवून EPFO ​​कडील नवीन PF योगदान आणि शिल्लक रक्कम तपासू शकतात.

‘EPFOHO UAN’ या फॉरमॅटमध्ये तुमच्या UAN-नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून एसएमएस पाठवा. यामध्ये तुमचा UAN क्रमांक नक्की नमूद करा. तुम्हाला प्रादेशिक भाषेत प्रतिसाद हवा असेल, तर संदेशात UAN नंतर तुमच्या पसंतीच्या भाषेचा कोड जोडा. ही सुविधा 10 भाषांमध्ये उपलब्ध असून तुम्ही – इंग्रजी (डीफॉल्ट), हिंदी (HIN), पंजाबी (PUN), गुजराती (GUJ), मराठी (MAR), कन्नड (KAN), तेलगू (TEL), तमिळ (TAM), मल्याळम (MAL) आणि बंगाली (BEN) यापैकी भाषा निवडू शकता.

UMANG ॲप वापरून EPF शिल्लक कशी तपासायची

सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून UMANG ॲप डाउनलोड करा. ॲप इन्स्टॉल केल्यावर लॉग इन करा आणि EPFO ​​सेवांचा लाभ घेण्यासाठी तुमचा UAN लिंक करा, त्यांनतर तुम्ही UMANG ॲपद्वारे सहजपणे तुमची पीएफ शिल्लक पाहू शकता, योगदानांचा मागोवा घेऊ शकता आणि क्लेम देखील दाखल करू शकता. वापरकर्ते PF पेन्शन खात्यातील गेल्या 3 महिन्यांच्या व्यवहारांचा तपशील पाहू शकतात आणि उर्वरित माहिती PDF स्वरूपात डाउनलोड करू शकतात.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत