मुंबई – गेले बऱ्याच दिवसापासुन राजकीय घडामोंडीना वेग आलेला आहे.. रोज कोणत्यांना कोणत्या चर्चांना उधाण आले आहे.. नुकताच मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस हे केंद्रांत जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या…त्यात आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या एका वक्ताव्याने पुर्णा चर्चांना उधाण आले आहे.., शरद पवार हे एनडीएसोबत आले असते तर राष्ट्रपती झाले असते, असा मोठा गौप्यस्फोट रामदास आठवले यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
काय म्हणाले राज्यमंत्री रामदास आठवले..?
राज्यमंत्री रामदास आठवले हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे किंवा त्याच्या कवितांमुळे चर्चेत असतात… बोलता बोलता ते राजकीय रहस्य उघडून टाकतात अशातच काल पुण्यात त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.. रामदास आठवले काल पुण्यात होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केलं. त्यांनी शरद पवार यांच्याबद्दलही भाकीत केलं. शरद पवार मोठे नेते आहे. त्यांचा आदर आहे. 2014 किंवा 2019 मध्ये शरद पवार आमच्यासोबत आले असते तर राष्ट्रपती झाले असते, असा गौप्यस्फोट रामदास आठवले यांनी केला आहे…..
अजित पवार असताना अनेक निर्णय झाले होते. सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्री करायचे ठरले होते, अशा चर्चा होती. पण आता अजित पवार नाहीत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आता होईल असे वाटत नाही. पण शरद पवार यांनी एनडीए सोबत यायला हवे होते, असं रामदास आठवले म्हणाले.त्यांच्या या वक्ताव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत…
