Headlines

तहसील कार्यालयातील पार्किंगच्या जागेवर जप्त वाहने; नागरीक त्रस्त:नागरिकांची गैरसोय, वाहने हटवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक‎




चांदूर रेल्वे येथील तहसील कार्यालय व न्यायालयाच्या आवारात गेल्या अनेक महिन्यांपासून रेतीचे ट्रक व ट्रॅक्टर उभे आहेत.या वाहनांमुळे तेथील पार्किंगच्या जागा तोकडी झाली असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार) पदाधिकाऱ्यांनी एसडीओंना निवेदन सादर करीत ही वाहने तत्काळ हटवण्याची मागणी केली. हे ट्रक व ट्रॅक्टर गेल्या काही दिवसांपूर्वी महसूल व पोलिस यंत्रणेच्या संयुक्त कारवाई दरम्यान जप्त करण्यात आले होते. या वाहनांमुळे तहसील कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहने पार्क करण्यासाठी जागा उपलब्ध होत नसून संपूर्ण परिसरही अस्वच्छ व विद्रूप बनला आहे. या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाच्या आवारातील सर्व रेतीचे ट्रक आणि ट्रॅक्टर तातडीने हटवून परिसर स्वच्छ व मोकळा करण्यात यावा, अशी मागणी पुढे आली आहे. या मागणीसाठी चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राकाँचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गणेश रॉय, तालुकाध्यक्ष विनोद काळमेघ, शहराध्यक्ष पांडुरंग डोंगरे, शहर उपाध्यक्ष सुरेश इमले, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष मोहम्मद समीर जानवानी, बंडू भैसे, अतुल मेटे, महिला तालुकाध्यक्ष माधुरी देशमुख, महिला शहराध्यक्ष नीलिमा शिरभाते, रेखा मोरे तसेच राजू वडतकर, मारोती डोंगरे, अशोक सोमकुंवर, प्रकाश कदम, शेख हसन, लक्ष्मण दर्येकर, मारोतराव गिरासे, मोहन रॉय, कमलकिशोर पनपालिया आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत