Sushma Andhare: अंधारे यांनी रविवारी (१३ जुलै) जखमी कामगारांसह आणि मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहरप्रमुख चेतन पवार या वेळी उपस्थित होते.

अंधारे म्हणाल्या, ‘मोशी कचरा डेपो येथील दुर्घटना ही मानवनिर्मित आहे. पाच जून रोजी या ठिकाणी प्रकल्पाची चिमणी पडली होती. हा अपघात का झाला, याची साधी चौकशीही अधिकाऱ्यांनी केली नाही. डेपोच्या शेजारी एक खाण आहे. त्यात स्फोट केले जातात. त्याचा या कचऱ्याच्या डोंगरावर काही परिणाम होतो का, हेही पाहिले गेले नाही. याउलट त्या ठिकाणी अनधिकृत इमारत उभी केली. तळमजला बांधण्याची परवानगी असताना दोनमजली इमारत बांधली. या इमारतीला सुरक्षा भिंतही नव्हती.’
Sushma Andhare |मोशी दुर्घटना प्रकरणी पालिका आयुक्त, प्रकल्प अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
‘ते’ कोणाला वाचवताहेत?
‘आयुक्त दुर्घटनेबाबत काही बोलत नाहीत, यात दोष कोणाचा, अनधिकृत बांधकाम होते, का नाही याबाबत अधिकृत बोलत नाही. ते कोणाला वाचवत आहेत, कचरा डेपोतील गैरप्रकार कोणाच्या सांगण्यावरून लपवत आहेत, त्यांच्या डोक्यावर कोणाचा वरदहस्त आहे, हे पाहायला हवे. या घटनेबाबत पर्यावरण विभागाचे संजय कुलकर्णीदेखील मौन बाळगून आहेत,’ अशी टीका अंधारे यांनी केली.
Moshi Accident: 83 तासांत मोशीतील रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात 8 जणांचा करुण अंत; घटनास्थळी कुटुंबाचा हंबरडा
काहींचे हिंदुत्व ‘सिझनेबल’
‘काही लोकांचे हिंदुत्व ‘सिझनेबल’ असते. सध्या निवडणूक नसल्याने ते हिंदू-मुस्लिम, जात-धर्म करायला घटनास्थळी आले नाहीत,’ अशी टीका अंधारे यांनी आमदार महेश लांडगे यांचे नाव न घेता केली. ‘जात-धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या स्थानिक पुढाऱ्यांना काहीही वाटत नाही. इथे जात-धर्म करायचे असते, तर फडणवीसांची ‘बारकी गँग’ लगेच हजर झाली असती,’ असेही त्या म्हणाल्या.

