Headlines

3 self-immolations in 3 days in Nepal; Jen-Zee takes to the streets again, employment failure; Demand for Balen’s resignation


  • Marathi News
  • International
  • 3 Self immolations In 3 Days In Nepal; Jen Zee Takes To The Streets Again, Employment Failure; Demand For Balen’s Resignation

राज शर्मा | काठमांडू6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

नेपाळमध्ये जेन-झी तरुणांचा संताप रस्त्यावर उतरला आहे. गेल्या तीन दिवसांत ३ तरुणांनी पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे. या घटना आणि बेरोजगारीच्या आघाडीवरील अपयशामुळे पंतप्रधान बालेंद्र शाह ‘बालेन’ यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. काठमांडूमध्ये तरुण निदर्शने करत आहेत, तर संसदेत विरोधकांनी सरकारला घेरले आहे.

मुख्य विरोधी पक्ष नेपाली काँग्रेसचा आरोप आहे की, बालेन सरकार तरुणांमध्ये आशा व विश्वास निर्माण करण्यात अपयशी ठरले आहे. उपसभापती विश्वप्रकाश शर्मा यांनीही आत्मदहनाच्या घटनांना राज्याप्रती वाढत्या निराशेचे प्रतीक म्हटले आहे. ते म्हणाले, ‘सध्याच्या सरकारमुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.’ दुसरीकडे, जेन-झी नेते मिराज ढुंगाना म्हणाले, आत्मदहनाच्या घटना सरकारविरोधाचे संकेत आहेत.

जेन-झीचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

‘जेन-झी नेपाळ’ या संघटनेने बालेन यांच्यावर हुकूमशाही पद्धतीने काम केल्याचा आरोप केला. संघटनेनुसार, सरकारने सुकुम्बासी भागातील घरांवर बुलडोझर चालवला व यंत्रणेचा गैरवापर केला. बजेट व धोरणांत तरुणांच्या रोजगार व उत्पन्नासाठी कार्यक्रम आणले नाहीत. सरकारने कार्यशैली न बदलल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पेट्रोल ओतून तिघांनी स्वतःला पेटवून घेतले

केस १: गणेश- बाईक रायडर होते. पोलिसांसोबत झालेल्या दंडाच्या वादातून स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. उपचारादरम्यान मृत्यू. केस २: व्यावसायिक राऊत- व्यवसायातील नुकसानीमुळे निराश होते. पेट्रोल ओतून आत्मदहन केले. केस ३: विवेक मंडल- पेट्रोल आत्मदहनाचा प्रयत्न केला. कारण अस्पष्ट. हेलिकॉप्टरने रुग्णालयात आणले गेले. प्रकृती गंभीर आहे.

  • २०२३ मध्ये प्रेम आचार्य यांनी आत्मदहन केले होते. तेव्हा काठमांडूचे तत्कालीन महापौर बालेन यांनी ‘राज्याचे संपूर्ण अपयश’ म्हटले होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत