Headlines

Mandira Bedi : पतीचं वयाच्या ५०व्या वर्षी निधन, मानसिकरित्या खचलेली अभिनेत्री, घ्यावी लागलेली थेरेपी


Mandira Bedi : अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचं वयाच्या ५०व्या वर्षी निधन झालं. पतीच्या निधनामुळे अभिनेत्री खचली होती. या कठीण काळाबद्दल मंदिरानं सांगितलं आहे.

Mandira Bedi Takes Therapy After Husband Death
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मंदिरा बेदी सध्या तिच्या आगामी ‘मॅक्स, मिन, अँड मियोझाकी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात अभिनेत्रीनं पती राज कौशलची आठवण सांगितली.

मंदिरा बेदीच्या वेदना

ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमातील एका संभाषणादरम्यान मंदिरा बेदी म्हणाली, ‘थेरपी, काउन्सिलिंग आणि स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न हा माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. मी जवळपास २० वर्षांपूर्वी पहिल्यांदा थेरपीसाठी गेले होते. ज्यावेळी, मी माझ्या आईला सांगितलं की, मी थेरपीसाठी गेले होते, तेव्हा तिनं विचारलं की, ‘का, तुला काय झालंय?’ मी म्हणाले की, मला फक्त मनातलं बोलायचं होतं. माझी आई म्हणाली, ‘तू माझ्याशी बोलू शकली असतीस,’ पण मी उत्तर दिलं, ‘नाही.’
Maharashtra TimesNimish Kulkarni : …म्हणून हास्यजत्रेत कधीतरीच दिसतो निमिष कुलकर्णी, अभिनेत्यानं सांगितलं कारण; व्यक्त केली खंत
अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘जेव्हा कधी मला माझ्या आयुष्यात काहीतरी चुकीचे घडत आहे असं वाटलं किंवा माझं संतुलन बिघडलं आहे असं वाटलं, तेव्हा मी थेरपिस्ट आणि काउन्सिलरची मदत घेतली. त्याचा मला नेहमीच खूप फायदा झाला. जेव्हा मी माझ्या पतीला गमावलं, तेव्हाही थेरपी माझ्यासाठी एक सांत्वनाचं साधन बनली आणि म्हणूनच मी तिचा आधार घेतला.’

Girish Pardeshi | गिरीश परदेशी दहा वर्ष कुठे गायब होता? ‘या सुखांनो या’च्या हिरोशी गप्पा

मंदिरा बेदीचा पती, राज कौशलचं २०२१ मध्ये वयाच्या ५० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. तो व्यवसायाने दिग्दर्शक होता आणि त्यानं ‘प्यार में कभी कभी’ आणि ‘शादी के लड्डू’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं. मंदिरा बेदीनं चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता राज कौशलसोबत १४ फेब्रुवारी १९९९ रोजी लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत. मुलगा वीर कौशल आणि मुलगी तारा बेदी कौशल. ताराला या जोडप्यानं २०२० मध्ये दत्तक घेतलं होतं.
Maharashtra TimesNafisa Ali : स्टेज 4चा कॅन्सर, नाही मानली हार, केमोथेरेपी घेत सुप्रसिद्ध अभिनेत्री करतेय काम; म्हणाली, ‘लढा सुरूच आहे’

‘मॅक्स, मिन, अँड मियोझाकी’ सिनेमाबद्दल

निर्मात्यांनी ट्रेलरसोबत ‘मॅक्स, मिन, अँड मियोझाकी’च्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. हा चित्रपट २४ जुलै २०२६ रोजी प्रदर्शित होईल. या सिनेमात मेधा शंकर, सिद्धार्थ मेनन, आदिल हुसेन, मंदिरा बेदी आणि नफिसा अली यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन नरसिंहमूर्ती यांनी केलं आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा