Headlines

अरे वा, म्हणजे आपल्याकडचाच! इंग्लंडमध्ये रोहित शर्माचा कोकणच्या सुपूत्राकडून सराव, पठ्ठ्याकडून एक मागणी


Rohit Sharma News : इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी कोकणातील सुपुत्र असलेल्या अविराज गावडे याची झालेली निवड अवघ्या कोकणवासी यांना अभिमानास्पद ठरली आहे. इतकंच नाही तर या स्पर्धेच्या सरावाला अविराजला क्रिकेटपटू रोहित शर्माला सरावात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर झालेला संवाद रोहित शर्मा याच्याजवळ झालेली ‘थेट भेट’ ही अविराज गावडे यांच्यासाठी त्याच्यातील क्रिकेटपटूला प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरले आहे.

Rohit Sharma Aviraj gavade
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, रत्नागिरी : क्रिकेटपटू म्हणून मोठे होण्याचे स्वप्न पाहणार्‍या प्रत्येक युवा खेळाडूला भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज रोहित शर्मा प्रत्यक्ष भेटावा, त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळावी आणि त्याच्याकडून मराठीतून मार्गदर्शन मिळावे, हे एखाद्या स्वप्नापेक्षा कमी अनुभव नाही. पण हे सगळे अविस्मरणीय क्षण रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू असलेला अष्टपैलू खेळाडू अविराज अनिल गावडे याने अनुभवले आहेत.

इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत असताना अविराजला रोहित शर्माला सरावात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर झालेला संवाद त्याच्यासाठी आयुष्यभराची प्रेरणा ठरला. अविराज गावडे सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाला असून आपल्या दमदार कामगिरीमुळे त्याने अनेक सामन्यांत ’मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारही पटकावले आहेत. त्याच काळात भारतीय संघाच्या इंग्लंड दौर्‍यापूर्वी सरावासाठी रोहित शर्मा मिडलसेक्स काऊंटीच्या मैदानावर येणार असल्याची माहिती मिळाल्याने अविराज आणि त्याचा मित्र त्याला भेटण्यासाठी मैदानावर गेले. अविराजने एनसीएचा टी-शर्ट घातल्यामुळे तेथील आयोजकांचे लक्ष त्याच्याकडे गेले. विंबल्डन क्लबचे चेअरमन सोहम यांनी अविराजची चौकशी केली. आपण लेगस्पिन गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू असल्याचे तसेच काऊंटी क्रिकेटमधील कामगिरीबद्दल सांगितल्यानंतर त्यांनी अचानक प्रश्न विचारला, रोहित शर्माला गोलंदाजी करशील का? क्षणभर अविराजही अवाक झाला.
Maharashtra TimesArgentina vs Egypt Match : इजिप्तचा अर्जेंटिनाविरूद्धचा विजय रेफ्रींनी चोरला’; न्यूयॉर्कच्या महापौरांकडून बोचरी टीका, 11 मिनिटात झालेले 3 गोल
सरावाचे साहित्य घरी असल्याचे सांगितल्यावर पंधरा मिनिटांत आणू शकशील का? असा प्रश्न विचारण्यात आला. अविराजने मित्राच्या मदतीने काही मिनिटांतच घरी जाऊन किट आणले आणि पुन्हा मैदानावर हजर झाला. थोड्याच वेळात रोहित शर्मा मैदानावर दाखल झाला आणि सरावाला सुरुवात झाली. सुरुवातीला प्रचंड दडपणाखाली असलेल्या अविराजला रोहितनेच धीर देत, दडपण घेऊ नकोस, तुझा नैसर्गिक खेळ खेळ, असे सांगितले. त्यानंतर अविराजने रोहितला सलग पाच षटके लेगस्पिन गोलंदाजी केली. एका अप्रतिम चेंडूवर त्याने रोहितला त्रिफळाचीतही केले. त्यानंतर हसत रोहित म्हणाला, आता कितीही चांगली गोलंदाजी केलीस तरी मी पुन्हा बाद होणार नाही, आणि त्याप्रमाणे उर्वरित सरावात तो बाद झाला नाही. मात्र सरावानंतर त्याने अविराजच्या गोलंदाजीचे मनापासून कौतुक केले.
Maharashtra TimesTeam India : वैभव सूर्यवंशीवरुन निवडकर्त्यांना सुनावलं, भावनिक होऊन निर्णय घेतला; माजी क्रिकेटर रोखठोक बोलला
सराव संपल्यानंतर रोहितने अविराजशी संवाद साधला. सुरुवातीला इंग्रजीत सुरू झालेली चर्चा अविराज महाराष्ट्रातील असल्याचे समजल्यानंतर थेट मराठीत सुरू झाली. अरे वा, म्हणजे आपल्याकडचाच आहेस, असे म्हणत रोहितने अगदी आपुलकीने संवाद साधला. या वेळी रोहित शर्माने युवा क्रिकेटपटूंना यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचा मंत्र दिला. फक्त चांगली लाइन-लेंथ टाकणे पुरेसे नाही. गोलंदाज असशील तर विकेट्स घ्यायच्या आणि फलंदाज असशील तर भरपूर धावा करायच्या. भारतात लाखो क्रिकेटपटू आहेत. त्यांच्यापेक्षा वेगळे दिसण्यासाठी कामगिरीच बोलली पाहिजे. मेहनतीला पर्याय नाही, असा सल्लाही त्याने दिला.
Maharashtra TimesPM Narendra Modi : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात PM नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, बिग बॅश क्रिकेट लीगचा पहिला सामना भारतात, कधी आणि कुठे होणार?
अविराजच्या मनगटातील नैसर्गिक कौशल्याचेही रोहितने कौतुक केले. तुझ्याकडे टॅलेंट आहे. आता फक्त जास्तीत जास्त विकेट्स आणि धावा करण्यावर लक्ष केंद्रित कर. बाकी काही वेगळे करण्याची गरज नाही, असेही त्याने सांगितले. इंग्लंडमध्ये चार महिने क्रिकेटसाठी राहण्याचा निर्णय घेतल्याबद्दलही रोहितने अविराजचे कौतुक करत, तू इथे येऊन मेहनत करण्याचा मोठा निर्णय घेतलास. आता सातत्य ठेव आणि मेहनत करत राहा, असा सल्ला दिला. संवादाच्या शेवटी अविराजने रोहितला आपल्या वडिलांशी फोनवर बोलण्याची विनंती केली. रोहितने आनंदाने होकार दिला. मात्र दोनदा प्रयत्न करूनही अविराजचे वडील अनिल गावडे यांना फोन लागला नाही. त्यावर रोहित हसत म्हणाला, काही हरकत नाही, पुढच्या वेळी नक्की बोलू. या संपूर्ण प्रसंगामुळे अविराज भारावून गेला. एवढा मोठा क्रिकेटपटू असूनही रोहितची साधी राहणी, नम्र स्वभाव आणि युवा खेळाडूंना दिलेले प्रोत्साहन पाहून तो प्रभावित झाला. माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोलाचा क्षण आहे. त्या रात्री मला झोपच लागली नाही. रोहित शर्मासारख्या महान खेळाडूने माझ्या खांद्यावर हात ठेवून दिलेला सल्ला आयुष्यभर विसरणार नाही, अशी भावना अविराज गावडे याने व्यक्त केली.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा