Headlines

MNS Chief Raj Thackeray Asked Question About RJ Malishka in His Speech


राज ठाकरे यांनी आपल्या आजच्या भाषणात आरजे मलिष्का हिचा उल्लेख केला. मलिष्काने काही वर्षांपूर्वी मुंबई तुझा बीएमसीवर भरोसा नाय काय? असं गाणं तयार केलं होतं. ते गाणं प्रचंड प्रसिद्ध झालं होतं. याच गाण्यावरुन राज ठाकरे यांनी आरजे मलिष्का हिच्याबद्दल प्रश्न विचारला.

Raj Thackeray
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात आरजे मलिष्काचा उल्लेख करत प्रश्न उपस्थित केला. मुंबईत मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दुर्घटना घडल्या. चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळले. या घटनेत एका शाळकरी चिमुकल्याचा मृत्यू झाला. तर एका ठिकाणी मॅनहोलमध्ये पडून वृद्धाचा मृत्यू झाला. कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू झाला. गोरेगावमध्ये झाड कोसळून दोन महिला जखमी झाल्याची घटना घडली. तसेच मुसळधार पावसामुळे भांडुपमध्ये रस्ता खचला. तर अनेक ठिकाणी पाणी साचलं. या घटनांवरुन राज ठाकरे यांनी टीका केली. यावेळी त्यांनी आरजे मलिष्काचा उल्लेख केला.

राज ठाकरे यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरच्या मिसिंग लिंकवर झालेल्या दुर्घटनेवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला. तसेच मिसिंग लिंकवरुन टीका केली म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या भाषणावरुनही राज ठाकरे यांनी टीका केली.

राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

“मिसिंग लिंकच्या घटनेवर बोललं म्हणून राजकारण करु नका. त्यावर बोललं म्हणजे राजकारण? दुसऱ्याचं सरकार होचं त्यावेळेला तुम्ही काय करत होता? त्यावेळेला जी आंदोलन झाली ते राजकारण नव्हतं? काय म्हणताय म्हणे, एकवेळ मला बोला, पण महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही. वा! लोकं त्या मिसिंग लिंकबद्दल बोलत आहेत. महाराष्ट्राचा कुठे अपमान करत आहेत?”, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

राज ठाकरेंचं राम मंदिर दान चोरी प्रकरणावर भाष्य

“केंद्र सरकारच्या गोष्टीबद्दल बोललं की, तुम्ही देशविरोधी. आता केंद्र सरकारची कामे आणि देशाचा काय संबंध? मिसिंग लिंकबद्दल बोललं तर यामध्ये महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? लोकांनी प्रश्नही विचारायचे नाहीत का?” असे सवाल राज ठाकरेंनी केले.

“इतके दिवस हे मोबाईल फोनवरुन विरोधकांना जे करत होते ते आता अंगलट आले. ते आता ह्यांच्या अंगावर येत आहे. आपणच या गोष्टी सुरु केलं आहे. विरोधकांना शिव्या घालणं, वाईट लिहिणं हे तुमच्यापासूनच सुरु झालं. तुमच्या अंगावर आलं तर महाराष्ट्राचा अपमान झाला. राम मंदिरातील चोरी बद्दल बोललं तर म्हणजे धर्माचा अपमान केला. चोरी आहे ती, त्यात कुठे धर्म आला?”, असा सवाल ठाकरेंनी केला.

“राम मंदिरात लोकांनी श्रद्धेने पैसे टाकले त्यांची चोरी झाली त्याबद्दल बोलायचं नाही? आम्ही धर्मविरोधी? हा देश धर्मविरोधी आहे? भाजपचा खासदाराच पहिल्यांदा म्हणाला की, राम मंदिरात चोरी झाली”, असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंचा मिसिंग लिंकवरच्या घटनेवरुन निशाणा

“मिसिंग लिंकवर एक मंत्री म्हणतो की, ते नैसर्गिक आहे. ती गोष्ट नैसर्गिक आहे, त्यामध्ये राजकारण आणू नका. हे लक्षात ठेवा. तुम्ही काही अमरपट्टा घेऊन आला नाहीत. जेव्हा तुम्ही विरोधात जाणार आणि अशी घटना घडेल तेव्हा लोकांना सांगा नैसर्गिक घटना आहे”, असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

“झाड पडून मुलगा जातोय, माणूस जातोय. एक मुलगा गटारात पडतोय, तर म्हणे नैसर्गिक आहे. त्यावर राजकारण करु नका. त्यावर बोलायचं नाही. दुसऱ्या पक्षाचे सरकार असले की हे त्यांचं राजकारण सुरु करणार. हा कसला प्रकार? मिसिंग लिंकवर नशिब माणसं मेली नाहीत”, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

राज ठाकरे RJ मलिष्काबद्दल काय म्हणाले?

“गंमत बघा! 2005 मध्ये हजोरा मिमी पाऊस मुंबईत पडला होता. त्यावेळी मुंबईत 1000 मिमी पाऊस पडला होता. आता 300 ते 350 मिमी पाऊस पडलाय. तरिही मुंबई तशीच तुंबलेली. तेव्हा वारेमाप वाट्टेल ते बोलायचे. तेव्हा राजकारण नाही. आता मुंबई तुंबली तर नाही नैसर्गिक आहे. कोण ती बाई, जी गाणी म्हणायची. मलिष्का. तुझा मुंबईवर भरोसा नाही का? आता ती कुठे गेली?”, असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले.

यावेळी उपस्थितांपैकी काही जणांनी मलिष्काने नवीन व्हिडीओ केला असल्याचं म्हणालं. त्यावर “नवीन व्हिडीओ केला असेल तर चांगलं आहे. म्हणजे ती कुणाला वाहिलेली नाही”, असं राज ठाकरे म्हणाले. “जेव्हा ती अशाप्रकारची गाणी गात होती तेव्हा सुख घेतलं. आता दुसरे बोलायला लागले त्यावेळी त्रास व्हायला लागला”, असंदेखील राज ठाकरे यावेळी म्हणाले.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा