IND vs ENG News : भारतीय संघाला श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात विजयाची श्रीगणेशा करता येत नाहीये. सलग दुसऱ्या सामन्यातही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव जिव्हारी लागणारा आहे. कारण टी-२० मध्ये भारताचा इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला आहे. नेमकी कुठे चूक झाली? जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने भारतावर १२५ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात कॅप्टन श्रेयस अय्यरने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडने २० ओव्हरमध्ये २०१-७ धावा केल्या होत्या. फिल साल्टने सर्वाधिक ७० धावांची अर्धशतकी खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. त्यानंतर सॅम करनने २४ चेंडूत ४१ धावांची आक्रमक खेळी केली. भारताचा संघ या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरल्यावर अवघ्या ७६ धावांवर ऑल आऊट झाला. भारताचा टी-२० इतिहासातील धावांनी झालेला सर्वात मोठा पराभव तर भारतीय संघाची टी-२० मधील दुसरी सर्वात कमी धावसंख्या ठरली.
इंग्लंडने २०० धावांचा टप्पा पार केला, फिल साल्टच्या ७० धावा आणि सॅम करनच्या ४१ धावांनी हे शक्य झाले. त्यासोबतच जोस बटलरनेही ३६ धावांची खेळी करत इंग्लंडला सुरूवात करून दिली होती. विल जॅक्सने दोन षटकार मारत १४ धावा करत २०० धावांच्या आसपास पोहोचवले होते. आजच्या सामन्यामध्ये भारताना प्रिन्स यादवला प्लेइंग ११ मध्ये जागा दिली होती. प्रिन्स यादवनेच इंग्लंडच्या पहिल्या दोन विकेट नावावर केल्या होत्या. भारताकडून प्रिन्स यादव आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन विकेट नावावर केल्या. IND vs ENG 3rd T20 : तिसऱ्या टी-20मध्ये प्रिन्स यादवच्या घातक यॉर्करवर बटलरचे डोळे फिरले, सगळेच शॉक; Video एकदा पाहाच या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवातच खराब झाली. दुसऱ्या ओव्हरमध्ये अभिषेक शर्मा १० धावांवर आऊट झाला. वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक १३ धावा केल्या यामध्ये त्याने दोन षटकार मारले खरे पण तो जोफ्रा आर्चरच्या बाऊन्सरवर आऊट झाला. वैभव आऊट झाल्यावर कोणीच मैदानात थांबले नाही, सर्वांनीच आक्रमण करण्याच्या नादात विकेट गमावल्या. ईशान किशन १३ धावा, श्रेयस अय्यर ५ धावा, अक्षर पटेल १० धावा, तिलक वर्मा ३ धावा, हर्षित राणा ९ धावा आणि शिवम दुबे २ धावा काढून माघारी परतले. भारताचा संघ ११.४ ओव्हरमध्ये ७६ धावांवर ऑल आऊट झाला. इंग्लंडकडून जोश टंगने सर्वाधिक ४ विकेट तर जोफ्रा आर्चरने ३ विकेट आणि आदिल राशिदने दोन विकेट नावावर केल्या. Erling Haaland : विश्व फुटबॉलचा नवीन हिरो, नॉर्वेचं ‘गोल मशीन’, एर्लिंग हालँड नेमका कोण? पोरानं बापाचं नाव काढलं, संपूर्ण प्रवास जाणून घ्या
T20 मध्ये भारताचा धावांच्या फरकाने सर्वात मोठा पराभव
१२५ धावांनी – विरुद्ध इंग्लंड, ट्रेंट ब्रिज, २०२६
८० धावांनी – विरुद्ध न्यूझीलंड, वेलिंग्टन, २०१९
७६ धावांनी – विरुद्ध दक्षिण आफ्रिका, अहमदाबाद, २०२६
५१ धावांनी – विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मुल्लानपूर, २०२५
५० धावांनी – विरुद्ध न्यूझीलंड, विशाखापट्टणम, २०२६
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा