मुंबई: ‘ महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स ‘ चित्रपटावरून सध्या राजकीय वातारणही तापल्याचं पाहायला मिळतंय. नाशिकमधील वादग्रस्त भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांवर आधारित आगामी चित्रपट ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चा टीझर रिलीज होताच राज्याच्या राजकीय आणि मनोरंजन वर्तुळात एकच खळबळ उडाल्याचं दिसून आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्याविरोधात २५ कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला असून कायदेशीर नोटीस बजावल्याचंही समोर आलं. या सगळ्या वादावर आता दीपाली सय्यद आणि सिनेमाच्या दिग्दर्शकांनी मौन सोडलं आहे.
रुपाली चाकणकर यांनी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्याविरोधात २५ कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला असून कायदेशीर नोटीस बजावली असल्यानं सिनमाचं काय होणार? याबद्दल चर्चा सुरू होती. आता यावर ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ सिनेमाच्या टीमनं पुण्यात पत्रकार परिषद घेत भाष्य केलं.
काय म्हटलं दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी? तर आमचा हा सिनेमा सत्य घटनेवरून प्रेरित असला तरी यात कोणत्याही व्यक्तीचं नाव, कोणत्याही व्यक्तीची ओळख वापरण्यात आली नाहीये. कोणाचीही मानहानी करण्याचा आमचा हेतू नाहीये. रुपाली चाकणकर यांनी २५ कोटींचा दावा ठोकला आहे, त्याला आमटी कायदेशीर म्हणजेच लीगल टीम उत्तर देईल, असं सावंत यांनी म्हटलं.
माझे यापूर्वीचे सिनेमे देखील स्त्रीयांवर, मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधत आवाज उठवणारे होते, समाजात जागृती करण्याच्या उद्देशानं बनवले होते. या सिनेमाचीही तोच उद्देश आहे, तसंच सिनेमा येत्या २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दीपाली सय्यद यांचं रुपाली चाकणकरांना उत्तर नमस्कार, मी ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ सिनेमातील कलाकार. आमच्यावर २५ कोटींचा दावा ठोकण्यात आलाय, ज्या व्यक्तीनं आमच्यावर दावा ठोकलाय, त्या व्यक्तीवर मला हसायला येतंय. कारण हा सिनेमा कोणाच्याही जीवनावर आधारित नाहीये, कोणाचा जीवनपट नाहीये. सिनेमात कोणत्याची व्यक्तीच्या नावाचा वापर करण्यात आला नाहीये. महाराष्ट्रात सुरू असलेली भोंदूगिरी आणि या संदर्भात जनजागृती, प्रबोधन करण्यासाठी या सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे. आम्ही कलाकार आहोत, त्यामुळे सिनेमासाठी रोक टोक केली जात आहे, ती चुकीची आहे.. असंही दीपाली यांनी म्हटलं. हा सिनेमा होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत, म्हणजे तुम्हीच काही तरी चुकीचं केलं आहे का? हे तपासून पाहायला हवं होतं. जे काही होत आहे, ते अत्यंच चुकीचं असल्याचंही दीपाली सय्यद यांनी म्हटलं.
काय आहे नेमकं प्रकरण? काही महिन्यांपूर्वी नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात यानं महिलांचं शोषण केल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं होतं. या प्रकरणात त्याचे अनेक राजकीय नेते आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी साटेलोटे असल्याचे आरोप झाले होते. याच पार्श्वभूमीवर दिग्दर्शक स्वरूप सावंत आणि निर्माते देवेंद्र भट, सूर्यकांत भुंडे यांनी ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ या चित्रपटाची घोषणा केली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या टीझरमध्ये, प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद या रुपाली चाकणकर यांच्याशी हुबेहूब साधर्म्य असलेले, त्यांची हेअरस्टाईल आणि व्यक्तिमत्त्व दर्शवणारे एक महत्त्वाचे पात्र साकारताना दिसत आहेत. यावरूनच वादाची ठिणगी पडली आहे.
माझी परवानगी घेतली नाही– रुपाली चाकणकर या संपूर्ण प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया देत रुपाली चाकणकर यांनी चित्रपटाच्या टीमला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. हे संपूर्ण प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. चित्रपटसृष्टीचा नियम आहे की, कोणत्याही जिवंत व्यक्तीवर आधारित पात्र पडद्यावर साकारताना संबंधित व्यक्तीची लेखी परवानगी घेणं आवश्यक असते. मात्र, चित्रपट निर्मात्यांनी माझी कोणतीही परवानगी घेतलेली नाही. माझी आणि माझ्या कुटुंबाची जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी हा घाट घातला गेला आहे. म्हणूनच मी निर्माते, दिग्दर्शक आणि दीपाली सय्यद यांना २५ कोटींची कायदेशीर नोटीस बजावली आहे.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा