मुंबई : भारतीय संघाचा स्टार खेळाडू संजू सॅमसन याला संघातून काढण्यात आले आहे. भारताला २०२६ च्या वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आज त्यालाच टीममधून बाहेर केल्याने चाहते नाराज झालेत. कारण इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत संजूला दुसऱ्या सामन्यात प्लेइंग ११ मधून बाहेर करण्यात आले होते. त्याचवेळी अनेकांना नाराजी व्यक्त केली होती, कारण वैभवला खेळवण्यासाठी संजू सॅमसनला खाली बसवलेलं कोणालाच आवडलं नव्हतं. पण आता संघातही त्याला जागा न दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आगामी झिम्बाव्बेविरूद्धच्या मालिकेमध्ये संजूला संघात जागा दिली नाही. इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या सामन्यात त्याला प्लेइंग ११ मधून बाहेर बसवलं, त्यानंतर आता टीममध्येही त्याला न घेतल्याने नेहमी संजूवरच अन्याय का अशी चर्चा क्रीडा वर्तुळात होताना दिसत आहे.
या मालिकेमध्ये भारताकडून अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी ओपनिंग करताना दिसणार आहेत. पर्याय म्हणून ईशान किशन असेल पण हाच संजू वर्ल्ड कपमध्ये भारताचा तारणहार ठरला होता. अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांची सलामी भारताला फायद्याची ठरत नव्हती, शेवटी दक्षिण आफ्रिका संघाकडून झालेल्या पराभवानंतर संजूला प्लेइंग ११ मध्ये जागा देण्यात आली. त्यानंतर भारताचा सामना वेस्ट इंडिजसोबत होणार होता, करो या मरो अशा स्थितीत असणाऱ्या सामन्यात संजूने नाबाद ९७ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर सेमी फायनलमध्येही इंग्लंडविरूद्ध ८९ धावा आणि फायनल सामन्यात न्यूझीलंडविरूद्ध ८९ धावा करत भारताला सलग दुसरी वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. आज त्याच संजूवर काय वेळ आलीय, संघात त्याला जागा दिली जात नाहीये. IND vs ZIM T20 Series : भारत-इंग्लंड मालिकेदरम्यान BCCI कडून झिम्बाव्बे दौऱ्यासाठी टीमची घोषणा, संजू सॅमसनला डच्चू; 4 अनकॅप खेळाडूंची निवड वर्ल्डकपनंतर संजू सॅमसन याने आयर्लंडविरूद्ध काही खास कामगिरी केली नाही. एकटा संजूच नाहीतर सर्व संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. कारण आयर्लंडने भारताल २-० ने हरवले होते. त्यानंतर इंग्लंडविरूद्ध पहिला सामना पावसाने रद्द झाला आणि दुसऱ्या सामन्यात त्याला खाली बसवले गेले. पहिल्या सामन्यात भारताने बॅटिंग केली होती. त्यावेळी संजू मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला होता. वैभव सूर्यवंशी याला संधी दिली जावी अशी मागणी होत होती. या दबावामध्ये मॅनेजमेंटने संजूला प्लेइंग ११ मधून बाहेर बसवण्याचं ठरवलं. पण दुसरा सामना भारताने गमावला. तिसऱ्या सामन्यात त्याला खेळवतील अशी आशा नाही. परंतु यादरम्यान झिम्बाव्बेविरूद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर झाल्यावर त्याची निवड झाली नाही. IND vs ENG 3rd T20 : भारत वि. इंग्लंड तिसरा टी-20, वैभव सूर्यवंशी इंग्लंडला फोडून काढणार? किती वाजता मॅच सुरू होणार? दरम्यान, भारतासाठी ज्याने वर्ल्ड कप जिंकवला आज त्यालाच तीन मॅचमधील कामगिरीवरुन बाहेर काढलं. बीसीसीआयचा नेमका विचार काय सुरू आहे? समजत नाही. युवा खेळाडूंना संधी द्यायची पण वरिष्ठ खेळाडू म्हणजे एक मॅचविनर ज्याने कधी विजेतेपदाची ट्रॉफी उंचावली त्याच्यावर अशी वेळ आल्याने चाहते निराश झाले आहेत.
झिम्बाब्वे टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ :– श्रेयस अय्यर (C), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (VC), इशान किशन (WK), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा, प्रभसिमरन सिंह (WK), मयंक यादव
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा