Headlines

Mira Bhayandar Rain: आठवड्यातच रस्त्यांची चाळण; मिरा-भाईंदरमध्ये खड्ड्यांमुळे रस्ते विदीर्ण, वाहनचालकांची कसरत


Mira Bhayandar Rain Update: गेल्या काही वर्षांपासून पावसाळा आणि मिरा-भाईंदरमधील खड्डेमय रस्ते हे जणू समीकरणच बनले आहे.

मिरा भाईंदर
मिरा भाईंदर पाऊस(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : पावसाळ्याला अवघा आठवडा होत असतानाच मिरा-भाईंदरमधील बहुतांश डांबरी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्डेमुक्त रस्त्यांचे आश्वासन दिले जात असताना प्रत्यक्षात रस्त्यांची झालेली दुरवस्था प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची तक्रार करण्यात येत आहे.

निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही समस्या निर्माण होत असल्याचा आरोप होत असला, तरी शहराची भौगोलिक परिस्थितीही त्याला कारणीभूत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून शहरातील काही रस्त्यांचे काँक्रीटीकरण शेकडो कोटी रुपये खर्चुन करण्यात आले आहे. मात्र, निधीअभावी अनेक रस्त्यांचे काँक्रीटीकरण अद्याप झालेले नाही. डांबरी रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडण्याची समस्या दरवर्षीची असल्याने पावसापूर्वी आवश्यक दुरुस्ती होणे अपेक्षित होते. मात्र, त्याकडे पुरेसे लक्ष दिले गेले नसल्याची टीका होत आहे.

Maharashtra TimesShivsena News: ‘थोडा भ्रष्टाचार झालाच पाहिजे’; शिंदेंच्या शिवसेनेचा उपनगराध्यक्ष सर्वांसमोर हे काय बोलून गेला? चहूबाजूने टीकेची झोड!
परिणामी, पावसाळा सुरू होऊन अवघा आठवडा उलटताच शहरातील अंतर्गत तसेच प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काही रस्त्यांची तर अक्षरशः चाळण झाली आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचत असल्याने खड्डे दिसत नाहीत आणि त्यामुळे अपघाताचा धोका वाढल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना याचा मोठा फटका बसत असून खड्डे चुकवताना अपघात होण्याची भीती सतावत असल्याचे त्यांनी सांगितले.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्यांची अशी अवस्था झाली असेल, तर पुढील काही महिन्यांत परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीतीही काही वाहनचालकांनी व्यक्त केली. पालिका प्रशासनाच्या दरवर्षीच्या कार्यपद्धतीबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Maharashtra TimesEknath Shinde : दगदग-धावपळीने अशक्तपणा, एकनाथ शिंदे रुग्णालयात, कशी आहे प्रकृती? Health Update समोर
पाणी रस्त्यावर
मिरा-भाईंदर महापालिकेने रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाबरोबरच नाल्यांचे रुंदीकरण आणि खोलीकरणाची कामे केली आहेत. मात्र, त्यानंतरही अनेक ठिकाणी पावसाचे पाणी नाल्यांमध्ये न जाता थेट रस्त्यावरून वाहत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली जात असून वाहनचालकांना पाण्यातूनच वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे नाल्यांच्या कामावर झालेल्या खर्चाच्या परिणामकारकतेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा