Shocking incident in pune woman doctor ends life from the building; पुण्यातील नामांकित रुग्णालयातील महिला डॉक्टरचं धक्कादायक पाऊल; इमारतीवरून झोकवून देत मृत्यूला कवटाळलं
Shocking incident in pune woman doctor ends life from the building; पुण्यातील नामांकित रुग्णालयातील महिला डॉक्टरचं धक्कादायक पाऊल; इमारतीवरून झोकवून देत मृत्यूला कवटाळलं
श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड: पिंपरी- चिंचवड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. थेरगाव येथील एका नामांकित खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. डॉ. श्वेता रोकडे असे मृत डॉक्टरचे नाव असून, त्यांच्या अकाली निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. श्वेता रोकडे या रावेत येथील सेलेस्टीयल सिटी सोसायटीमध्ये आपल्या दोन मैत्रिणींसोबत भाड्याने राहत होत्या. नेहमीप्रमाणे त्या आपल्या कामावर जात होत्या. मात्र, अचानक घडलेल्या या घटनेने त्यांच्या सहकाऱ्यांसह परिचितांनाही मोठा धक्का बसला आहे.
घटनेची माहिती मिळताच रावेत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋषिकेश घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या डॉ. श्वेता यांना तातडीने औंध येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली असून, त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळावरील परिस्थिती, सीसीटीव्ही फुटेज, तसेच त्यांच्या मैत्रिणी आणि संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्राथमिकदृष्ट्या ही आत्महत्या असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला, तरी कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. आत्महत्येमागे मानसिक ताण, वैयक्तिक कारणे किंवा अन्य कोणते कारण आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक तपास आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा