Headlines

Top-5 Mid Cap Mutual Funds for SIP; 5 वर्षात 25 लाखांचा नफा; कमी खर्चात बंपर परतावा देणारे टॉप-5 फंड, 100-500 रुपये SIP तून होऊ शकता लखपती


Best Mutual Fund Performance: शेअर बाजारात गेल्या काही महिन्यात अस्थिरतेचे वर्चस्व राहिले तरी, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीबाबत लोकांचे आकर्षण कमी झालेले नाही. बाजारातील काही घसरणीत नक्कीच काही मोजक्या लोकांनी गुंतवणूक कमी केली, पण त्यासोबतच दीर्घकालीन गुंतवणूक करणारे अजूनही या चढ-उतारात स्थिर राहिले आहेत.

Top-5 Mutual Funds for July 2026 Investment
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Best Mutual Funds: जुलै महिन्यात तुम्ही गुंतवणुकीसाठी म्युच्यूअल फंडच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. देशांतर्गत बाजारात अनेक फंड्स आहेत पण, त्यापैकी योग्य फंड निवडणे नक्कीच आव्हानात्मक ठरू शकते. म्हणूनच आज आपण 5 फंड्सबद्दल जाणून घेऊया जे तुम्हाला काही वर्षातच लखपती बनवू शकतात.

जुलै महिना आणि सध्याची जागतिक परिस्थिती पाहता 5 म्युच्युअल फंड्स गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरू शकतात. हे पाच फंड्स तुम्हाला लाखो रुपयांचा फंड कसा तयार करून देऊ शकतात पाहूया.
Maharashtra TimesGold Rate Today: घसरत्या सोन्याच्या दराला मोठा ब्रेकडाऊन, किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी वाढ; चांदीच्या किमतीत जोरदार तेजी, आजचा भाव काय?

टॉप-5 म्युच्यअल फंड्स

  • कोटक मिड-कॅप म्युच्यअल फंड
  • निप्पॉन इंडिया मिड-कॅप ग्रोथ फंड
  • एसबीआय लार्ज आणि मिड-कॅप फंड
  • आदित्य बिर्ला सनलाइन निफ्टी डिफेन्स इंडेक्स फंड
  • कोटक इक्विटी सेव्हिंग्ज

तज्ञांच्या शिफारशींनुसार सध्या गुंतवणुकीसाठी मिड-कॅप फंड आकर्षक पर्याय असल्याचे दिसत असून तुम्ही या फंडांमध्ये अगदी 100 रुपये किंवा 500 रुपये इतक्या कमी रकमेपासून SIP सुरू करू शकता. वर नमूद म्युच्युअल फंड्सबद्दल तपशील खालीलप्रमाणे आहे.
Maharashtra TimesDonald Trump: भारताला ‘मृत अर्थव्यवस्था’ म्हणून हिणवणाऱ्या ट्रम्प यांनी भारतातूनच केली 81 कोटी रुपयांची कमाई, कसं ते समजून घ्या

फंडाचे नाव फंडाचा आकार (कोटींमध्ये AUM) किमान एसआयपी रक्कम NAV एक्स-रेशो पाच वर्षांचा CAGR
कोटक मिडकॅप फंड 64,749 कोटी रुपये 100 रुपये 168.01 रुपये 0.38% 18.45%
निप्पॉन इंडिया मिडकॅप ग्रोथ फंड 47,415 कोटी रुपये 100 रुपये 4,954.98 रुपये 0.73% 21.46%
एसबीआय लार्ज अँड मिडकॅप फंड 53,527.40 कोटी रुपये 500 रुपये 105.05 रुपये 0.86% 12.17%
आदित्य बिर्ला सनलाइन निफ्टी डिफेन्स इंडेक्स फंड 1,165 कोटी रुपये 500 रुपये 13.66 रुपये 0.28% NA
कोटक इक्विटी सेव्हिंग्ज 10,108 कोटी रुपये 100 रुपये 30.30 रुपये 0.67% 10.67%

लक्षात घ्या की सामान्यतः म्युच्युअल फंड दीर्घकाळात 12 टक्के परतावा मिळतो, पण तुमच्याकडे फंडाच्या परताव्याची माहिती असेल, तर गणना करणे सोपे होते. समजा तुम्ही निप्पॉन इंडिया मिडकॅप ग्रोथ फंडमध्ये एसआयपी केली तर, तुम्ही या फंडात रु. 25 लाखांपेक्षा जास्त निधी उभारू शकता.
Maharashtra TimesEPFO New Rule Explained: 100000 मूळ पगार तरी 1800 रुपयेच PF कट होणार, असं का? छोटी बचत देईल 19 लाखांचा रिटायरमेंट फंड, जाणून घ्या नवा फॉर्म्युला
दरमहा गुंतवणूक: 25000 रुपये
गुंतवणुकीचा कालावधी: 5 वर्षे
5 वर्षांत मिळणारे व्याज: 21.46%
5 वर्षांतील एकूण गुंतवणूक रक्कम: 15,00,000 रुपये
5 वर्षांतील एकूण परतावा: 10,56,549 रुपये
5 वर्षांत तयार झालेला एकूण फंड: 25,56,549 रुपये

अशाप्रकारे, वरील कॅल्क्युलेशननुसार पाच वर्षात 25 लाख रुपयांचा फंड उभा करू शकता.

(Disclaimer : वरील तपशील केवळ माहितीसाठी आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजार, म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते, त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या. तुमच्या नफा किंवा तोट्यास लेखक किंवा महाराष्ट्र टाइम्स व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.)

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा