Headlines

‘रिंग रोड’मुळे पुण्यातील बांधकामे बाधित होणार, PMRDAची कबुली; मार्गाच्या नकाशात मोठा गोंधळ| Maharashtra Times


PMRDA Ring Road: पुण्यातील अंतर्गत भागात ८३ किमी लांब रिंग रोड तयार केला जात आहे. पण पीएमआरडीएकडून या मार्गाचा आराखडा तयार करताना मोठा गोंधळ झाला असल्यामुळे नागरिकांना फटका बसत आहे.

पुणे रिंगरोड
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रथमेश गोडबोले, पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) विकसित केल्या जाणाऱ्या वर्तुळाकार रस्त्यामध्ये ( रिंग रोड ) अनेक बांधकामे बाधित होत असल्याची कबुली प्राधिकरणाने प्रथमच दिली आहे. ‘पीएमआरडीए’च्या बांधकाम विभागानेच रिंग रोडची आखणी झालेल्या ठिकाणी ४७ बांधकामांना परवानग्या दिल्या असून, प्रत्यक्षात २१ ठिकाणी बांधकामे झाली आहेत.

नकाशा, झोनिंगमध्ये फरक

‘पीएमआरडीए’ने प्रादेशिक विकास आराखड्यातील रिंग रोड विकसित करण्याचा निर्णय घेतला. तो ६५ मीटर रुंदीचा आहे. यानुसार रिंग रोड जाणाऱ्या भागातील नागरिकांना बांधकाम परवानगीचे नकाशे आखून दिले; ते मंजूर झाले. ‘पीएमआरडीए’च्या अभियांत्रिकी विभागाने बांधकाम विभागाशी चर्चा न करताच रिंग रोडचा सुधारित प्रस्ताव सरकारकडे पाठवला. यात काही ठिकाणी मोठ्या लिफ्ट, जंक्शन प्रस्तावित आहेत. हे प्रसिद्ध केले नसल्याने बांधकाम विभागाने नकाशे आखून दिलेल्यांचे नुकसान होणार आहे. ‘पीएमआरडीए’च्या संकेतस्थळावरील रिंग रोडचा नकाशा आणि झोनिंग करून देत असलेला नकाशा यात फरक होता. रिंग रोडच्या मार्गातील नागरिकांना प्लॅन अद्ययावत करताना नव्याने झोनिंग करून घ्या, असे ‘पीएमआरडीए’कडून सांगितले जात होते. हे करताना तुमच्या इमारतीवर रिंग रोडचे जंक्शन आले आहे, असे सांगण्यात आल्याने अनेक नागरिक अडचणीत आले आहेत.

Maharashtra TimesNashik Ring Road: रिंगरोडसाठी ५६ हेक्टर क्षेत्राची खरेदी, नाशिकच्या २० गावांमध्ये भूसंपादन सुरू; योग्य मोबदला देण्याचं आश्वासन

‘एसआयए’त फसवणूक’

याबाबत बोलताना नागरी हक्क संस्थेचे अध्यक्ष सुधीर कुलकर्णी म्हणाले, ‘रिंग रोडच्या आखणीत केलेला बदल संकेतस्थळावर टाकलेला नसताना सन २०२३मध्ये ‘सोशल इम्पॅक्ट ॲसेसमेंट’ (एसआयए) करताना फसवणूक केल्याचे नागरिकांच्या लक्षात आले.’

माहिती देण्यास टाळाटाळ

‘ छोट्या भूखंडधारकांनी बांधकाम परवानगी घेऊन ‘रेरा’कडे नोंदणी करून सदनिका, गाळ्यांची विक्री केली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून माहिती अधिकारातून माहिती मागवली जात होती. मात्र, ती धक्कादायक असल्याने माहिती देण्यास अभियांत्रिकी, बांधकाम आणि नियोजन विभागाकडून टाळाटाळ होत आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हवेली, मुळशी तालुक्यांतून जाणाऱ्या रिंग रोडमध्ये बांधकामे, इमारती, मोकळ्या जागा, गोदामे बाधीत होत आहेत. या ठिकाणी जंक्शन प्रस्तावित केले असून, सुमारे १४९ मीटर जागा बाधीत होत असल्याचे समोर येत आहे,’ असेही ते म्हणाले.

Maharashtra TimesPune Ring Roadच्या नियोजनाचा खेळखंडोबा! रस्ते विकास महामंडळाकडून ११७ गावं पुन्हा ‘पीएमआरडीए’कडे; आराखडा रखडणार?

पीएमआरडीएचे म्हणणे काय?

रिंग रोडचे संरेखन झाल्यानंतर केवळ एकच बांधकाम परवानगी अनावधानाने देण्यात आली आहे; तसेच लिफ्ट, जंक्शन प्रस्तावित केल्याने रिंग रोडमध्ये एकूण ४७ बांधकाम परवानग्या प्रभावित होत आहेत. मात्र, प्रत्यक्षात २१ बांधकामे असल्याचे दिसून येत आहे. जास्तीत जास्त बांधकामे वाचविण्याचा ‘पीएमआरडीए’चा प्रयत्न आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा