Headlines

आमरस, अनारसे अन् पुरणपोळीचा बेत, आगडगावात अधिक मासानिमित्त धोंड्याच्या जेवणाचा सोहळा – adhik maas celebration at kalbhairavnath aagadgaon ahilyanagar



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अधिक मासाच्या पवित्र पर्वाला सुरुवात होताच श्री क्षेत्र काळभैरवनाथ आगडगाव येथे भक्ती, परंपरा आणि अन्नदानाचा भव्य संगम पाहायला मिळाला. देवस्थानच्या वतीने तब्बल ५०० जावयांसाठी पारंपरिक धोंड्याच्या जेवणाचा थाट मांडण्यात आला असून, १५ हजारांहून अधिक भाविकांसाठी महाप्रसादाची भव्य तयारी करण्यात आली आहे. गावासह परिसरात या अनोख्या सोहळ्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अधिक मासात जावयांना मानपान देण्याची जुनी परंपरा जपत आगडगाव देवस्थानने यंदा हा सोहळा अभूतपूर्व पद्धतीने साजरा केला. गावात आलेल्या सर्व जावयांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यांना पाच पोशाख भेट देण्यात आले, तर मुलींना पैठणी देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर सवाद्य मिरवणुकीने संपूर्ण गाव भक्तिमय आणि उत्सवी वातावरणात न्हाऊन निघाले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत