Headlines

Sangeeta Patil NCP Sangli ZP President ; सांगली झेडपीमध्ये 34 मतांनी गेम फिरला, महाविकास आघाडीचा झेंडा फडकला, अध्यक्ष-उपाध्यक्ष दोन्ही पदांवर कब्जा


सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संगीता पाटील यांची अध्यक्षपदी तर काँग्रेसच्या ऋषिकेश लाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली असून, भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

Sangli Zila Parishad president and vice president 2026
महाविकास आघाडीचा सांगली जिल्हा परिषदेवर विजय(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्वप्निल एरंडोलिकर, सांगली: सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत अखेर महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने भारतीय जनता पक्षाचा पराभव करत जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या संगीता पाटील यांची अध्यक्षपदी, तर काँग्रेसचे ऋषिकेश लाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

असे राहिले मतांचे समीकरण

एकूण ६१ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत विजयी उमेदवारांना ३४ मते मिळाली. ही निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची बनली होती. मतदानादरम्यान राजकीय समीकरणे वेगाने बदलली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ची दोन मते भाजपच्या पारड्यात पडली, मात्र शिवसेना (शिंदे गट) चे दोन सदस्य तटस्थ राहिल्याने भाजपची गणिते बिघडली. परिणामी, महाविकास आघाडीने बहुमताचा आकडा गाठत विजय निश्चित केला.

प्रतिष्ठेची लढत आणि नेत्यांची रणनीती

ही निवडणूक प्रामुख्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील अशी रंगली होती. भाजपने सत्ता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र जयंत पाटील आणि तासगावचे आमदार रोहित पाटील यांनी आखलेल्या रणनीतीपुढे भाजपला नमावे लागले.

Maharashtra TimesPune Accident : भल्या पहाटे वाहनांची जोरदार धडक, कारचा अक्षरश: चेंदामेंदा, तरुणाचा जागीच मृत्यू; पुण्यात भीषण अपघात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजयकाका पाटील, अजितराव घोरपडे आणि विलासराव जगताप यांनी महाविकास आघाडीची मोट बांधण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे, अजित पवार गटातील काही नेत्यांच्या मदतीने महाविकास आघाडीने जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचा ‘करेक्ट कार्यक्रम’ यशस्वीपणे पूर्ण केला.

कार्यकर्त्यांचा जल्लोष

निवडणुकीचा निकाल जाहीर होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद परिसरात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा जल्लोष केला. “जयंत पाटील आणि रोहित पाटील यांच्या नेतृत्वाचा हा विजय आहे,” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

जिल्हा परिषदेतील या सत्तांतरामुळे सांगलीच्या ग्रामीण राजकारणात महाविकास आघाडीची पकड अधिक मजबूत झाली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा