Headlines

दोन महिन्यातचं ‘कनेक्टिंग लिंक’वर थरारक घटना, बोगद्यात दोन-तीन दगड पडले; चालत्या गाडीवर आदळले|


Missing Link Tunnel: महाराष्ट्र दिनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक)चं लोकार्पण झालं. तेव्हापासून मुंबई-पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठा फायदा झाला आहे. पण मार्गावरील एका बोगद्यामध्ये नुकतीच एक धक्कादायक घटना घडली.

कनेक्टिंग लिंक
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. प्रतिनिधी, लोणावळा: मुंबई-पुणे महामार्गाच्या कनेक्टिंग लिंकने (मिसिंग लिंक) मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या एका कारवर कनेक्टिंग लिंकच्या बोगदा क्रमांक दोनमध्ये दोन ते तीन दगड पडले. त्यामुळे कारची पुढची काच फुटली असू, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सोमवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ही घटना घडली.

चालकाच्या अंगावर फुटलेल्या काचा

खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या चारचाकीच्या पुढच्या काचेवर कनेक्टिंग लिंकमधील बोगदा क्रमांक दोनमध्ये दोन ते तीन दगड पडल्याने कारची पुढची काच फुटली. कारचालक उचप्पा खतनाप्पा वरचल्ली (वय ५३, रा. खोपोली, रायगड) यांच्या अंगावर कारच्या फुटलेल्या काचा पडल्या. या प्रकरणी कारचालकाने तक्रार दाखल केली नाही.

Maharashtra TimesNashik Traffic Updates : नाशिकमध्ये संत निवृत्तिनाथ महाराज पालखी मार्गात बदल, द्वारकाऐवजी ट्रॅक्टर हाऊसमार्गे जाणार; शहरातील पालखीमार्ग वाचा सविस्तर

घटनेची माहिती मिळताच खंडाळा महामार्गाचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल, पोलिस उपनिरीक्षक समीर कटपाळे, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक कर्मचारी सुरेश ढेरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली.

दोन महिन्यांपूर्वीच पुलाचं उद्घाटन

१ मे २०२६ रोजी मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंक प्रवासासाठी अधिकृतपणे खुले करण्यात आले. महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितित हा लोकार्पण सोहळा पार पडला. दृतगती मार्गावरील नव्या मिसिंग लिंकमुळे मुंबई ते पुणे प्रवासात २५ ते ३० मिनिटं वेळ वाचतो आहे. वाहतूक कोंडीच्या दिवशी तब्बल १ तास वेळ वाचत आहे. मुंबई-पुणे दृतगती महामार्ग आणि जुना महामार्ग (NH-48) खंडाळा घाटात एकत्र येतो. त्यामुळे या पट्ट्यात प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यात पावसाळ्यात या मार्गावर दरडीही कोसळतात. त्यामुळे प्रवास असुरक्षित होतो आणि वेळही वाढतो. पण कनेक्टिंग लिंकमुळे खंडाळा घाटाला बायपास करून खेट प्रवास शक्य झाला आहे.

कनेक्टिंग लिंकवरील बोगदा जगातील सर्वात रुंद भुयारी बोगदा आहे. हा मुख्य बोगदा ८.९२ किमी लांब असून २३.३ मीटर रुंद आहे. हा संपूर्ण मार्ग आठ पदरी आहे. मार्गाच्या उद्घाटनावेळी राज्याला या बोगद्याचे गिनीज वर्लड रेकॉर्ड प्रमाणपत्र मिळालं. तब्बल १७० फूट खोल दरीवर हा बोगदा बांधला आहे.

Maharashtra TimesMumbai-Vadhavan Connectivity: सी लिंक, बोगदा आणि कनेक्टरसह बांधणार ‘मुंबई-वाढवण एक्सप्रेसवे’; MMRDAकडून भूसंपादनाला सुरुवात

दरीत उभारला केबल-स्टेड पूल

याशिवाय टायगर व्हॅलीवर ६५० मीटर लांब केबल-स्टेड पूल देखील उभारला आहे. दरीवर तब्बल ४४० फूट उंचीवर हा पूल उभारला गेला आहे. दोन्ही जुळ्या बोगद्यांना हा पूल एकमेकांशी जोडतो. या पुलावरही आठपदरी वाहतूक असल्यामुळे वाहतूककोंडी होत नाही. ही दरी अतिशय खोल आहे. त्यामुळे या दरीमध्ये खांब उभारणं पर्यावरणासाठी घातक होतं.त्यामुळेच डोंगराच्या कडांवर पायलन पिलर्स उभे करून मजबूत स्टील केबलच्या मदतीने हा पूल बांधण्यात आला आहे. या मार्गाचा बराच भाग डोंगरातून जात असल्यामुळे दोन मुख्य बोगदे बांधणयात आले आहेत.

पुलावर वारं वेगाने वाहतं. त्यामुळे पुलावर गाडी थांबवणे, पुलावर उतरणे, गाडीतून उतरून व्हिडीओ किंवा सेल्फी काढण्यास सक्त मनाई आहे. सीसीटीव्ही कॅमेराद्वारे थेट वाहनचालकांचं ई-चलान कापलं जातं.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा