राज ठाकरेंना मतं मिळत नाहीत, उद्धव ठाकरेंना मनसेचा फायदा नाही; रामदास आठवलेंचं विधान – rpi leader ramdas athawale made statement on raj thackeray and uddhav thackeray mns shiv sena ubt alliance
राज ठाकरेंना मतं मिळत नाहीत, उद्धव ठाकरेंना मनसेचा फायदा नाही; रामदास आठवलेंचं विधान – rpi leader ramdas athawale made statement on raj thackeray and uddhav thackeray mns shiv sena ubt alliance
राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यातच दोन्ही नेत्यांच्या वक्तव्याने या चर्चांना आणखी बळ मिळतंय. ठाकरे बंधू एकत्र आल्यास पुन्हा नवी राजकीय समीकरणं बनण्याची शक्यता असतानाच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी मोठं विधान केलंय. रामदास आठवले हे वर्ध्यात आले असता पत्रकारांनी त्यांना मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीवर प्रश्न विचारला, ज्यावर आठवलेंनी आपलं मत मांडत उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर पडावे लागेल असं म्हणत ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुतीची ताकद वाढेल असं विधान केलंय. पण त्याचसोबत राज ठाकरेंच्या मनसेल कमी मतं पडत असल्याने उद्धव ठाकरेंना त्यांचा फायदा होणार नाही असंही म्हटलं.