Pune Nasrapur Case Verdict Senior Police Inspector Vijaymala Pawar reaction on Bhimrao Kamble Death Penalty Crime News; आईच्या मनाला मोठी वेदना, भावना बाजूला ठेवून कर्तव्याला प्राधान्य; नसरापूर केसमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची भावूक प्रतिक्रिया
Pune Nasrapur Case Verdict Senior Police Inspector Vijaymala Pawar reaction on Bhimrao Kamble Death Penalty Crime News; आईच्या मनाला मोठी वेदना, भावना बाजूला ठेवून कर्तव्याला प्राधान्य; नसरापूर केसमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची भावूक प्रतिक्रिया
Nasrapur Case Verdict : भावना बाजूला ठेवून पोलिस अधिकारी म्हणून कर्तव्याला प्राधान्य दिले आणि प्रकरणाचा काटेकोर तपास करून चिमुकलीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, अशी भावनिक प्रतिक्रिया या गुन्ह्याच्या तपास अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांनी व्यक्त केली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ४०७ (१) नुसार, नसरापूर बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपीला दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब केले जाईल. तिथे पुण्याच्या विशेष न्यायालयात चाललेल्या खटल्याच्या सुनावणीत उपस्थित पुराव्यांचा साकल्याने विचार करून फाशीच्या शिक्षेची योग्यता ठरविली जाईल. याशिवाय आरोपीला विशेष न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात आव्हान याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे. त्याचे अपील व शिक्षा निश्चितीचा दावा एकत्रित चालवून सरकार आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकला जाईल. त्या आधारे उच्च न्यायालय आरोपीच्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीबाबत निर्णय देईल.
पवार म्हणाल्या, ‘घटना घडल्यानंतर सुरुवातीला मला घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी पाठविण्यात आले होते. त्या वेळी या गुन्ह्याचा तपास पुढे माझ्याकडे येईल, अशी कोणतीही कल्पना नव्हती. घटनास्थळी पोहोचल्यानंतर चिमुकलीचं पार्थिव पाहिलं आणि तिच्यावर झालेल्या अमानुष अत्याचारांची माहिती समोर आली. तो क्षण अत्यंत वेदनादायी होता. मन पूर्णपणे सुन्न झाले होते. त्या निष्पाप चिमुकलीवर झालेली क्रूरता पाहून मन हेलावून गेले. मात्र, त्या भावनांमध्ये वाहून जाण्याऐवजी पोलिस अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडणे अधिक महत्त्वाचे होते. त्यामुळे वैयक्तिक भावना बाजूला ठेवून संपूर्ण लक्ष तपासावर केंद्रित केले.’
स्वत:ची मुलगी समजून केला तपास
‘नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात चिमुकलीला स्वतःची मुलगी समजून प्रत्येक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्याने अहोरात्र मेहनत घेऊन तपास पूर्ण केला,’ अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गिल म्हणाले, ‘घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास पुन्हा दृढ करण्यासाठी जलद आणि दर्जेदार तपास करणे आमच्यासमोरील मोठे आव्हान होते. तपासातील प्रत्येक अधिकाऱ्याला स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली होती. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. साक्षीदारांनीही मोठे सहकार्य केले.’
‘टीम वर्क’चे दर्शन
विशेष न्यायालयाने पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, विशेष सरकारी वकील अजय मिसर, बचाव पक्षाचे वकील हिम्मतराव सूर्यवंशी आणि मुख्य लोक अभिरक्षक कार्यालयाचे प्रमुख ॲड. करीम जीवनी यांच्यासह तपास यंत्रणा व न्यायालयीन यंत्रणेतील उत्कृष्ट समन्वयाची विशेष नोंद घेऊन ‘सांघिक कामगिरीचे उत्तम उदाहरण’ म्हटले आहे. Nashik News : मटणानंतर दही खाललं, नाशकात शेतकरी दाम्पत्याला विषबाधा, महिलेचा करुण अंत, वृद्धाची मृत्यूशी झुंज पोलिसांनी दिवस-रात्र एक करून भक्कम पुरावे गोळा केले, तर तज्ज्ञांनी वेळेवर फॉरेन्सिक विश्लेषण केले. विशेष सरकारी वकील आणि सर्वच यंत्रणांच्या तत्परतेमुळे सलग काम होऊन अवघ्या १६ दिवसांत ५५ साक्षीदारांची साक्ष नोंदवली गेली. खटल्यात एकदाही पुढची तारीख मागण्यात आली नाही; तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कार्यरत ठेवणाऱ्या व टंकलेखन करणाऱ्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या कामाचाही न्यायालयाने गौरव केला.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा