Headlines

Akanksha Chamola Gaurav Khanna Divorce Reason Revealed In Lock Upp 2 ; Akanksha Chamola Gaurav Khanna Divorce : गौरवला मूल हवंय अन् मला नको! लॉकअप 2 च्या तिसऱ्याच एपिसोडमध्ये आकांक्षा चमोलाने सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण


Akanksha Chamola Divorce Reason : गेले काही दिवस आकांक्षा चमोला भरपूर चर्चेत आहेत. तिने गौरव खन्नाशी घटस्फोट होत असल्याचा खुलासा केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचवल्या होत्या. आता लॉक अप शोच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये तिने यामागचं कारण सांगितलं.

akanksha chamola
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बहुचर्चित शो ‘लॉक अप’ सीझन 2 च्या प्रीमियरदरम्यान, अभिनेत्री आकांक्षा चमोलाने ती गौरव खन्नापासून घटस्फोट घेत असल्याचा खुलासा केला. या खुलाशाने अनेकांच्या भुवया उंचवल्या. तिने सांगितले की ती पहिल्यांदाच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती शेअर करत आहे. तिसऱ्या एपिसोडमध्ये, आकांक्षाने सह-स्पर्धक श्रेया कालरा आणि सूफी मोतीवाला यांच्याशी घटस्फोटामागच्या कारणांबद्दल मोकळेपणाने चर्चा केली.

आकांक्षा म्हणाली, “आम्ही विवाहित असताना, मला कधीच मातृत्वाची ओढ किंवा भावना जाणवली नाही. तरीही, मी या कल्पनेचा विचार करण्यास नेहमीच तयार होते आणि ती भावना कधीच दाबून टाकली नाही. हळूहळू मला जाणीव झाली की ही भूमिका माझ्यासाठी योग्य नाही, आणि त्यालाही त्याबद्दल काही अडचण नव्हती. पण मला वाटते की कालांतराने तो दृष्टिकोन बदलला.”

मुलांच्या मुद्द्यावरून आकांक्षा चमोलाचा घटस्फोट

तिने पुढे सांगितले, “आता त्याला मुले हवी आहेत आणि मी त्याला ती देऊ शकत नाही. माझ्यामध्ये मातृत्वाची भावना नाही; हे मी खूप आधीच स्पष्ट केले होते. जेव्हा मला समजले की मी यासाठी तयार नाही, तेव्हा मी स्पष्ट केले की मी त्या मार्गावर जाणार नाही. त्यामुळे, आमची चर्चा झाली आणि मी त्याला सांगितले की जर त्याला मला सोडून जायचे असेल, तर तो जाऊ शकतो. खरं तर, लोक लग्नाचा निर्णय याचसाठी घेतात… 99 % लोक मुले आणि कुटुंब हवे असल्यामुळेच लग्न करतात. आयुष्यात पुढे जाण्यासाठी; अन्यथा, लग्न कशासाठी करायचे?”

Maharashtra TimesSinger Harry Styles : लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान घसा सुकल्यावर पाणी प्यायला अन् थेट स्टेटवरच कोसळा सुप्रसिद्ध गायक, व्हिडिओ व्हायरल

आकांक्षाला मूल दत्तक घेण्याचीही इच्छा नाही

आकांक्षाने पुढे सांगितले की तिला मूल दत्तक घेण्याचीही इच्छा नाही, कारण तिला मुलांशिवाय आपले आयुष्य जगायला आवडते. गौरवने या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही; तो सध्या ‘खतरों के खिलाडी 15’ मध्ये सहभागी झाला आहे.

आकांक्षा चमोला कोण आहे?

आकांक्षा चमोला ‘संतोषी माँ’, ‘ये है आशिकी’ आणि ‘क्राइम पेट्रोल’ यांसारख्या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये झळकली आहे. तिने आणि गौरव खन्नाने काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर 2016 मध्ये लग्न केले. असे म्हटले जाते की त्यांची भेट एका ऑडिशनदरम्यान झाली आणि ते प्रेमात पडले. गौरव आणि आकांक्षा 24 नोव्हेंबर 2016 रोजी गौरवचे मूळ गाव असलेल्या कानपूरमध्ये ते विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे कार्यक्रम 3 दिवस चालले होते.

Maharashtra TimesWelcome To The Jungle Box Office : वेलकम टू द जंगलने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, प्रचंड गल्ला कमावत रविवारी सर्वाधिक कमाई करणारा वर्षातील 6 वा सिनेमा

गौरवला मूल हवे होते

‘बिग बॉस’च्या काळात, आपल्या पत्नीच्या मूल न होण्याच्या निर्णयाबद्दल चर्चा केल्यामुळे ‘सिम्पथी कार्ड’ वापरल्याचा आरोप झाल्यावर गौरव भावूक झाला होता. ही घटना गेल्या वर्षीच्या ‘फिनाले वीक’च्या पहिल्या दिवशी घडली होती. फायनलिस्ट स्पर्धकांना प्रसारमाध्यमांच्या रोखठोक प्रश्नांना सामोरे जावे लागले होते. तेव्हा एका पत्रकाराने गौरवला शोमधील त्याच्या त्या जुन्या विधानाबद्दल प्रश्न विचारला, ज्यात त्याने पत्नीला मूल नको असल्याचे सांगितले होते; पत्रकाराने नमूद केले की, अनेक प्रेक्षकांना हा सहानुभूती मिळवण्याचा एक जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न वाटला होता.

गौरवने पत्नीसाठी त्याग करण्याची तयारी दर्शवली

भावूक झालेला गौरव आपल्या पत्नीच्या निर्णयाच्या समर्थनार्थ बोलला. त्याने स्पष्ट केले की, जरी त्याचे मुलांवर खूप प्रेम असले आणि लग्नानंतर त्याला बाप होण्याची इच्छा असली, तरीही फार कमी पुरुष आपल्या पत्नीवर इतके प्रेम करतात की ते स्वतःच्या मनातील तीव्र इच्छांचा त्याग करू शकतील. हा त्याच्यासाठी अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि त्याची पत्नी जो काही निर्णय घेईल, त्याचा तो नेहमीच आदर करेल अन् तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. ‘लॉक अप: सच या सजा’ या शोबद्दल बोलायचे झाल्यास हा शो नेटफ्लिक्सवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. रितेश देशमुख आणि फराह खानचे सूत्रसंचालन करत आहेत.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा