Pune Nasrapur Case Verdict Judge S R Salunkhe reaction on Victim Family Crime News; लाडक्या मुलीला न्याय मिळावा, पालकांच्या भावनांची जाणीव; नसरापूरच्या नराधमाला मृत्युदंड, निकालपत्रात काय?
Pune Nasrapur Case Verdict Judge S R Salunkhe reaction on Victim Family Crime News; लाडक्या मुलीला न्याय मिळावा, पालकांच्या भावनांची जाणीव; नसरापूरच्या नराधमाला मृत्युदंड, निकालपत्रात काय?
Special Judge on Bhimrao Kamble : खून करण्याची पद्धत, त्यामागचा हेतू, गुन्ह्याचे समाजविरोधी घृणास्पद स्वरूप, गांभीर्य, असाधारण बाब आणि गुन्हेगाराच्या परिस्थितीचा उहापोह निकालात केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘आरोपी ६५ वर्षांचा असून, त्याला सात मुली व एक सज्ञान मुलगा आहे. त्याने तीन वर्षांच्या मुलीला गाठी शेव देऊन वासरू दाखविण्याच्या आमिषाने तिच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. तिची हत्या केल्यानंतरही तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असून, त्यासाठी आरोपीला मृत्युदंडाची शिक्षाही अपुरी ठरू शकते. आरोपी सुधारणेच्या पलीकडे गेला असून, समाजासाठी धोकादायक ठरतो,’ असे निरीक्षण विशेष न्यायालयाने निकालात नोंदविले आहे.
‘आरोपीने असाह्य स्थितीत असलेल्या तीन वर्षांच्या पीडितेवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला. तिचे लेगिंग्ज तिच्या तोंडात २१ सेंटीमीटर खोलवर कोंबले, तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. त्यामागे कामवासना तृप्तीचा हेतू होता. हे निश्चितच समाजविरोधी घृणास्पद कृत्य आहे. पीडितेचा शवविच्छेदन अहवाल, सीसीटीव्हीत कैद झालेला तिचा अखेरचा आक्रोश आणि छायाचित्रे गुन्ह्याची तीव्रता दर्शवितात. हे सर्व पुरावे आरोपीचे रानटी व अमानवी वर्तन अधोरेखित करतात.’ असे न्यायालयाने म्हटले आहे.
“न्यायालयीन विवेक केवळ नोंदीवरील तथ्यांचा विचार करीत नाही, तर पीडितेने भोगलेल्या वेदना, तिचा शेवटचा आक्रोश आणि तिच्या आई-वडिलांच्या भावनांची जाणीवही न्यायालयाने ठेवली आहे. नवजात सुंदर वासरू पाहण्यासाठी उत्सुक निष्पाप मुलगी आरोपीसमवेत आनंदाने लहान पावलाने चालत होती. मात्र, हा आपल्या आयुष्यातील अखेरचा प्रवास ठरेल, याची तिला कल्पना नव्हती. लाडक्या मुलीला न्याय मिळावा; म्हणून न्यायालयाच्या दरवाजात प्रतीक्षा करणाऱ्या तिच्या पालकांच्या भावनांची जाणीवही न्यायालयाने ठेवली आहे.” – एस. आर. साळुंखे, विशेष न्यायाधीश (निकालपत्रातील निरीक्षण)
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा