Sindhudurg Crime News : राज्यात दिवसेंदिवस आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच सिंधुदुर्गमध्ये अशीच एक मोठी घटना समोर आली आहे. एसटी आगारात काम करत असलेल्या एका ३५ वर्षीय युवकाने आपलं आयुष्य संपवलं आहे.
एसटी डेपो वाहक लाडोबा लाड आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड एसटी आगारात वाहक म्हणून सेवेत असलेल्या ३५ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. लाडोबा उर्फ नाना मेघश्याम लाड (वय ३५) असं आत्महत्या केलेल्या वाहक युवकाचं नाव आहे. लाडोबा हा देवगड एसटी आगारात वाहक म्हणून गेली १५ वर्षे नोकरीस होता. अत्यंत प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ वाहक म्हणून त्याची ओळख होती.
नेमकं काय घडलं?
कोळंब खडवणनाका येथील लाडोबा मेघश्याम लाड याचं पार्थिवनांदरूख सतीची खाण परिसरातील जंगलमय भागात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे. त्याच्या आकस्मिक निधनामुळे त्याच्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला धक्का बसला आहे. त्याच्या निधनाची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. काल शनिवारी दुपारी कोळंब स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक तसेच त्याचा मित्रपरिवार उपस्थित होता. नाभिक समाज बांधवांच्यावतीने कोळंब स्मशानभूमीत श्रद्धांजली वाहण्यात आली.
नाना लाडहा वाहक म्हणून सन २००९ मध्ये नोकरीस देवगड एसटी डेपो याठिकाणी सेवेत रुजू झाला होता. त्याला अनेकदा मालवण येथे बदली करून घेण्याची संधी मिळाली होती. मात्र त्याच्या कामातील दर्जेदारपणामुळे एसटी प्रशानाकडून त्याला देवगडमध्येच काम करण्याची विनंती करण्यात येत असल्याने त्याने त्याचठिकाणी गेली १५ वर्ष सेवा बजावली होती.
गेले काही दिवस तो सुट्टीवर असल्याचं देवगडमधील त्याच्या मित्रपरिवाराकडून सांगण्यात येत होते. नांदरुख सतीची खाण परिसरात नाना लाड याची दुचाकी गाडी रस्त्याच्या बाजूला उभी होती. जंगलमय भागातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत त्याचा पार्थिव आढळून आला. नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचं दिसून आलं. स्थानिक सरपंच व पोलीस पाटील यांनी एक दुचाकी संशयास्पदरित्या रस्त्यावर असल्याचं पोलिसांना सांगितलं.
पोलिसांनी गाडीच्या नंबरवरून शोध मोहिम सुरू केली होती. यावेळी नाना लाड घरी नसल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून मिळाली. यामुळे घटनास्थळी जात पोलिसांनी शोध घेतला असता लाड यांचा पार्थिव गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. नाना लाड यांचा चुलत भाऊ गौरव लाड यांनी पोलिसांत माहिती दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू नोंद करत शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता.
काल शनिवारी सकाळी त्याचा भाऊ मुंबई येथून आल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. पार्थिव विच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतदेह घरी नेल्यानंतर लाड कुटुंबियांनी केलेला आक्रोश मने हेलावून टाकणारा होता. नाना लाड हे मितभाषी, परोपकारी वृत्तीचे होते. कोळंब खडवणनाका परिसरातील महापुरूष देवालयाच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात त्याचा सहभाग नेहमी असायचा. लाड याच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत. लाडोबा लाड हा नाना लाड या नावाना ओळखला जात असे. तो अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा