![]()
नोकरीच्या निमित्ताने बँकॉकला नेऊन तिथून तरुणांना म्यानमार सीमेवर ओलीस ठेवले जात असल्याचा प्रकार बीडच्या एका तरुणामुळे समोर आला आहे. त्यांच्याकडून सायबर गुन्हेगारी करून घेतली जात असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील एजंटांमार्फत बीडसह नाशिक, धाराशिव, चाळीसगाव, ठाणे येथील तरुणांची नोकरीसाठी निवड झाली होती. नंतर या तरुणांना म्यानमार सीमेवर नेऊन डांबण्यात आले आहे. इतर जिल्ह्यांतील तरुणांचीही काही नावे आता समोर आली आहेत. दरम्यान,बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी तरुणाच्या सुटकेसाठी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र पाठवले आहे. बँकॉक येथे ७० हजार रुपये महिना पगाराच्या नोकरीची सोशल मीडियातील जाहिरात पाहून केज तालुक्यातील एका तरुणाने अर्ज केला होता. त्या तरुणाने यापूर्वी लाओसमध्ये नोकरी केल्याने त्याला परदेशातील नोकरीचा अनुभव होता.त्याची नोकरीसाठी निवड होऊन ४ जून रोजी तो बँकॉकला गेला होता. त्याच्यासह महाराष्ट्रातील नाशिक,धाराशिव, चाळीसगाव, ठाणे येथील आणखी काही तरुणही होते. एका एजंटाच्या माध्यमातून या तरुणांची नोकरीसाठी निवड झाली होती. हे सर्व म्यानमार सीमेवर अडकले. मंत्रालयाला पत्रव्यवहार या प्रकरणी सायबर ठाण्यात गुन्हा नोंद आहे. तरुणांच्या सुटकेसाठी परराष्ट्र मंत्रालयाला याची माहिती देऊन पत्रव्यवहार केला आहे. – नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक, बीड केंद्राच्या हालचाली सुरू या तरुणांना म्यानमार सरकारच्या मदतीने सोडवून पुन्हा भारतात आणण्यासाठी केंद्र शासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारत सरकार याबाबतची सर्व माहिती म्यानमार सरकारला देत आहे. जंगलात आयटी पार्क या तरुणांना जिथे जंगलात ठेवले आहे तिथे गोदामासारखे मोठे ऑफिस आहे. त्याला आयटी पार्क म्हटले जाते. इथेच या तरुणांकडून १६ ते १८ तास काम करून घेतले जात आहे. नकार दिल्यानंतर मारहाण केली जात आहे.
Source link
महाराष्ट्रातील एजंटामार्फत बँकॉकच्या नोकरीसाठी झाली होती अनेकांची निवड:नाशिक, धाराशिव, चाळीसगाव, ठाण्याचे तरुणही माफियांच्या जाळ्यात
