Mahesh Tilekar : महेश टिळेकर यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये स्वामींच्या भक्तीच्या नावाखाली चालेल्या व्यवसायाबद्दल भाष्य केलंय.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश टिळेकर कायम स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. मुलाखतींदरम्यान महेश टिळेकर एखाद्या विषयावर परखडपणे आपलं मत व्यक्त करतात. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये टिळेकरांनी स्वामी भक्तीच्या नावाखाली चालू असणाऱ्या व्यवसायाबद्दल भाष्य केलं आहे.
महेश टिळेकर यांचं परखड मत
मुलाखतीदरम्यान महेश टिळेकर म्हणाले की, ‘प्रत्येकाची स्वामींची भक्ती असते. पण, उगाच त्याचं व्यावसायीकरण करा, त्या भक्तीचा बाजार करून काही जण पैसे मिळवण्याचा मार्ग शोधतात, ते मला आवडत नाही. मी कित्येक व्हिडिओ बघतो. ज्यामध्ये, स्वामींच्या अवतारात येऊन बारसं असलेल्या मुलाला घेऊन स्वामी त्याचं बारसं करतात. मला खरंच कीव येते.’
‘तुम्ही देवाला देवाच्या ठिकाणीच ठेवा. देवाला तुम्ही माणसात आणताय. एके ठिकाणी पाहिलं, स्वामींचा वेश परिधान केलेला कलाकार स्वामी कधी वागलेही नसतील असे विचित्र हातावारे करत होता. मग, माझं डोकं फिरतं. तुम्ही भक्तीचा बाजार मांडताय ना! करणाऱ्याला काहीतरी वाटलं पाहिजे. साई-बाबांची भूमिका सुधीर दळवींनी सिनेमात करणं वेगळं, पण तसा वेश करून जर रस्त्यावर कुणी फिरत असेल आणि त्याची कला विकून जर काही करत असेल, तर ते मला वाटतं चुकीचं आहे.’ असं महेश टिळेकर यांनी कॉसमोस्टार मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं. Deool Band 2 नं ओलांडला 100 कोटींचा टप्पा; प्रवीण तरडेंचा आनंद गगनात मावेना, केली मोठी घोषणा
टिळेकरांनी सांगितला अक्कलकोटचा अनुभव
याच मुलाखतीदरम्यान टिळेकरांनी अक्कलकोटचा अनुभवही शेअर केला आहे. ‘अक्कलकोटला अन्नछत्र आहे. तिथल्या लोकांनी ‘मराठी तारका’ शो तिथे करावा असं सांगितलेलं. पण, त्या कार्यक्रमात नृत्य असतं, त्यामुळे मला जमणार नाही असं मी सांगितलेलं. पण, तरीही त्या लोकांनी आग्रह केला. त्यामुळे, मी म्हटलं तिथे शो करायचाय तर तशा पद्धतीची गाणी निवडली पाहिजेत. अक्कलकोटला भक्तनिवासमध्ये सगळे कलाकार राहिले, जेवणही तिथेच अन्नछत्रात केलं. स्वामींच्या दारात आपला शो झाला, याचं समाधान मात्र मला मिळालं.’ असं महेश टिळेकरांनी शेवटी सांगितलं.
महेश टिळेकर यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी ‘लाडी गोडी’, ‘वन रूम किचन’, ‘आधार’, ‘हवाहवाई’ यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा