Headlines

याला म्हणतात कॅप्टन! हरमनप्रीतचा ऑस्ट्रेलियाला दणका, 25 चेंडूत फिफ्टी ठोकत महिला टी-20 विश्वचषकात पहिल्यांदाच…


IND W vs AUS W News : करो वा मरोच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरमनप्रीत कौरने २७ चेंडूत ५६ धावांची तडाखेबाज खेळी केली. अवघ्या २५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे. महिला टी-२० विश्वचषक २०२६ च्या आजच्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर १७१ धावांचे आव्हान ठेवले आहे. लॉर्ड्सवर प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ४ बाद १७० धावा केल्या आहेत.

Harmanpreet Kaur, 25-ball fifty, Australia, T20 World Cup
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय महिला संघाला सर्वाधिक गरज असताना कर्णधार हरमनप्रीत कौरने पुन्हा एकदा तिने सामन्यात आपली छाप सोडली. महिला टी-२० विश्वचषक २०२६ मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या करो वा मरोच्या सामन्यात हरमनप्रीतने अवघ्या २७ चेंडूत ५६ धावांची तडाखेबाज खेळी केली. या खेळीदरम्यान तिने २५ चेंडूत अर्धशतक पूर्ण करत भारताकडून महिला टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मोठ्या सामन्यांमध्ये हरमनप्रीत नेहमीच संघासाठी पुढे येते, याची प्रचिती पुन्हा एकदा पाहायला मिळाली. भारतावर दबाव असताना तिने आक्रमक फलंदाजी करत डावाची गती वाढवली.

विशेष म्हणजे, भारताकडून महिला टी-२० विश्वचषकात सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम यापूर्वीही तिच्याच नावावर होता. २०२४ च्या स्पर्धेत तिने २७ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध २५ चेंडूत हा टप्पा गाठत तिने स्वतःचाच विक्रम मोडला.

ऑस्ट्रेलियाला १७१ धावांची गरज

हरमनप्रीतच्या या खेळीच्या जोरावर भारताने २० षटकांत ४ बाद १७० धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १७१ धावांचे लक्ष्य ठेवले. हरमनप्रीत फलंदाजीला आली, तेव्हा भारताच्या २ बाद ८३ धावा झाल्या होत्या. स्मृती मंधानाने ३७ चेंडूत ३८ धावांची खेळी केली होती. त्यानंतर हरमनप्रीतने डावाची जबाबदारी स्वीकारत धावगती कायम ठेवली. हरमनप्रीतने आपल्या २७ चेंडूंच्या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकार लगावले. विशेष म्हणजे, डावाच्या २०व्या षटकात सोफी मोलिन्यूच्या गोलंदाजीवर तिने सलग तीन षटकार ठोकत भारताची धावसंख्या १७० पर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Maharashtra TimesVenezuela Earthquake : मैदान गाजवणारा फुटबॉलपटू नियतीसमोर हरला! एका क्षणात पत्नीसह दोन्ही चिमुरडे कायमचे दुरावले; क्रीडाविश्वात हळहळ

भारताला सलामीवीर स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. दोघींनी पॉवरप्लेमध्ये ४३ धावांची भागीदारी रचली. शफालीने २६ चेंडूत ३४ धावा करत वेगवान खेळी केली. मात्र सोफी मोलिन्यूने तिला स्टंपवर गोलंदाजी करत भारताला पहिला धक्का दिला.

या सामन्यात भारतीय संघात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. नंदिनी शर्माच्या जागी वेगवान गोलंदाज क्रांती गौडला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आङे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियानेही एक बदल करत अलाना किंगऐवजी फोबी लिचफिल्डला संधी दिली आहे. त्यामुळे आता बॉलिंग करताना क्रांती कसा खेळ करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारत संघांची प्लेइंग ११

स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, ऋचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, राधा यादव, श्री चरणी, रेणुका सिंह ठाकूर, क्रांती गौड.

ऑस्ट्रेलिया संघांची प्लेइंग ११

बेथ मूनी (यष्टीरक्षक), जॉर्जिया वोल, फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, ॲशले गार्डनर, जॉर्जिया वेअरहॅम, ॲनाबेल सदरलँड, निकोला केरी, सोफी मोलिन्यू (कर्णधार), किम गार्थ, लुसी हॅमिल्टन

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा