Headlines

Girija Oak : ‘आता आम्ही फार संपर्कात नाही, त्यांचंही कुटुंब आहे’, वडील गिरीश ओक यांच्याबद्दल गिरिजा ओकचं वक्तव्य


Girija Oak : गिरिजा ओकनं एका मुलाखतीमध्ये गिरीश ओक यांच्याबद्दल भाष्य केलं असून आता ते फार संपर्कात नसल्याचं तिनं सांगितलं आहे.

Girija Oak On Girish Oak
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – गिरिजा ओक ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून सध्या ती ‘भारत भाग्य विधाता’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. गिरिजा तिच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. गिरिजा ही प्रसिद्ध मराठी अभिनेते गिरीश ओक यांची मुलगी असून गिरिजा लहान असतानाच गिरीश आणि त्यांच्या पहिल्या पत्नीचा घटस्फोट झाला. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये गिरिजाने गिरीश ओक यांच्यासोबतच्या बॉण्डिंगबद्दल भाष्य केलं आहे.

गिरीश ओक यांची मोठी फॅन

गिरीश ओक यांच्याबद्दल बोलताना गिरिजा ओक म्हणाली की, ‘मी लहान असताना माझ्या बाबांची सगळ्यात मोठी फॅन होते. मी जवळपास त्यांची सगळी नाटकं पाठ होईपर्यंत बघितली आहेत. प्रत्येक नाटकाचे २०-२० प्रयोग मी बघितले असतील. ती नाटकं आणि बाबांचं काम बघतच मी मोठी झाले. त्यामुळे मी त्यांच्या कामाची खूप मोठी फॅन होते. कालांतराने माझे आई-वडील वेगळे झाले आणि मी माझ्या आईसोबत राहू लागले त्यामुळे बाबांसोबत फारसा संपर्क आला नाही.’

गिरीजा ओकचा आईसोबत भांडणाचा भन्नाट किस्सा

‘अजूनही एक कलाकार म्हणून माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे आणि त्यांनी आतापर्यंत जे काही काम केलंय, ते स्वकष्टाने केलंय. त्याबद्दल मला अभिमान आणि आदर आहे. पण, आता आम्ही फार संपर्कात नाही आहोत. कारण, मी माझ्या आईकडे राहायला लागले. त्यांचंही कुटुंब आहे, बायको आणि मुलगी आहे. सगळं उत्तम आहे. कुटुंब एकत्र आली की आम्ही भेटतो. पण, असं रोजचं बोलणं-भेटणं उरलं नाही. मला माझं आयुष्य आहे, त्यांना त्यांचं आयुष्य आहे. आजही मला ‘तुम्ही गिरीश ओक यांची मुलगी ना!’ असं विचारतात तेव्हा मला खूप छान वाटतं. अगदी वडिलांसारखं तुम्ही काम करता, हे ऐकल्यावरही मला आणखी छान वाटतं.’ असं गिरिजानं ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं.
Maharashtra TimesMahesh Tilekar : भक्तीच्या नावाखाली बाजार, स्वामींच्या अवतारात येऊन बारसं करतात, उगाच हातवारे करतात; महेश टिळेकर यांचं परखड मत
दरम्यान, गिरिजा ओकच्या कामाबद्दल सांगायचं तर तिनं ‘इन्स्पेक्टर झेंडे’, ‘तारे जमीन पर’, ‘परफेक्ट फॅमिली’, ‘जवान’ यांसारख्या हिंदी सिनेमा आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा