Headlines

Ketan Agarwal murder case Father says Siya goyals family already knew about hair wig; होय, केतन विग वापरायचा! सियाला आधी…; मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर केतनच्या वडिलांनी सगळं सांगितलं


Pune Crime News : केतन अग्रवाल प्रकरणात वडील विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मोठा दावा केला आहे. सिया गोयलच्या कुटुंबीयांना केतनच्या विगची माहिती आधीच होती, मग त्यावरुन हत्या करावी असे कोणाला वाटू शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Ketan Agarwal Death Case
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणातील तपास वेगाने सुरू असतानाच आता या प्रकरणात ‘विग’चा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी असा दावा केला की, लग्न निश्चित होण्यापूर्वीच सिया गोयलच्या कुटुंबीयांना केतन डोक्यावर विगचा छोटा पॅच वापरत असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे ही बाब आधीच माहीत असताना त्याच कारणावरून खून झाल्याचे कसे मान्य करता येईल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना विशाल अग्रवाल यांनी या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलदगतीने खटल्याची सुनावणी होईल, असे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

विशाल अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, लग्न ठरण्यापूर्वीच सिया गोयलच्या कुटुंबीयांना केतन विगचा छोटा पॅच वापरत असल्याची कल्पना देण्यात आली होती. त्यामुळे ही गोष्ट नवीन नव्हती. मग एवढ्या छोट्या कारणावरून एखाद्याचा खून होऊ शकतो का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मात्र, पोलिसांनी अद्याप विगचा आणि हत्येचा थेट संबंध असल्याचे अधिकृतपणे स्पष्ट केलेले नाही.

ट्रेकला जाण्याबाबतही दोन वेगवेगळे दावे

विशाल अग्रवाल यांनी आणखी एक दावा करत, लोहगड ट्रेकला जाण्याची इच्छा सिया गोयलचीच होती, असे म्हटले. मात्र, सियाची आई पूजा गोयल यांचा दावा वेगळा आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या आदल्या रात्री सियाने व्हिडिओ कॉल आणि चॅटमध्ये ट्रेकला जाण्याची इच्छा नसल्याचे सांगितले होते. मात्र केतन आणि त्याच्या आईने तिला जाण्यासाठी समजावले होते.

Maharashtra TimesTrain Ticket Refund Rules : ट्रेनचा प्रवास झाला तरी पैसे परत मिळतील, रेल्वेचा ‘हा’ नियम 90 टक्के प्रवाशांना माहितीच नाही

पोलिसांचा तपास कोणत्या दिशेने?

या प्रकरणात पोलिसांचा आरोप असा आहे की, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी कुटुंबाची बदनामी होण्याच्या भीतीने केतन अग्रवालच्या हत्येचा कट रचला. तपास यंत्रणेनुसार, लोहगड किल्ल्यावर पूर्वनियोजित कटाचा भाग म्हणून सियाने इशारा दिल्यानंतर चेतन चौधरीने केतनला दरीत ढकलल्याचा आरोप आहे. या आरोपांबाबत न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू आहे.

साहिल गोयलचीही चौकशी

दरम्यान, या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक करण्यात आला असून लोणावळा पोलिसांनी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल यालाही चौकशीसाठी बोलावले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याला सिया आणि चेतन चौधरी यांच्या कथित संबंधांची माहिती होती का, याचाही तपास केला जात आहे. पोलिसांकडून त्याचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणातील अनेक दाव्यांची सत्यता तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा