Headlines

ketan agrawal murder case siya goyal transferred 1 crore wedding money to chetan choudhary; केतनला संपवणं ही तर फक्त सुरुवात होती, सियाचा पुढचा प्लॅन चेतनसाठी होता, 1 कोटी रुपयांच्या ट्वीस्टने प्रकरणाला नवं वळण


Ketan Agarawal Lohagad Murder Case : केतन अगरवाल हत्या प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. आता प्राप्त झालेल्या नव्या माहितीनुसार सियाने आपल्या नियोजित पती म्हणजे केतनकडून काही पैसे घेतले होते, जे नंतर तिने तिचा प्रियकर चेतनला दिले होते, हे पैसे तिने त्याला कोणत्या कामासाठी दिले होते, याबाबतची माहितीही समोर आली आहे.

siya goyal transferred 1 crore to chetan
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : लोहगड पुणे येथील केतन अगरवाल हत्या प्रकरणात आता मोठा व्यवहारीक खुलासा समोर आला आहे. केतनला लोहगडावरुन ढकलून संपवल्याचा आरोप असलेल्या त्याच्या नियोजित पत्नी सिया गोयलने केतनकडून एक कोटी रुपये घेतले होते. हे पैसै तिने तिचा प्रियकर चेतन चौधरीला दिले होते, ज्याने केतनला संपवण्यात सियाची मदत केल्याचा आरोप आहे. तिने ही एक कोटी रुपयांची रक्कम लग्नाच्या खरेदीसाठी घेतली होती. पोलिसांच्या खात्रीलायक सूत्रांच्या हवाल्याने एनडिटीव्हीने हे वृत्त दिले आहे.

२० वर्षीय सियाने २२ वर्षीय तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने सियाचा होणारा पती केतन अगरवाल याच्या हत्येचा कट आखला होता. हा कट आखताना त्यांनी त्यांच्या भविष्याचाही विचार केला होता, जेणेकरुन त्यांच्यावर कोणाला शंका घेता येणार नाही. त्यांनी केतनच्या हत्येनंतर काही दिवसांनी लग्न करण्याचे ठरवले होते. दरम्यान, १८ जून २०२६ रोजी सिया-चेतनने मिळून केतनला खोल दरीत ढकलून जिवे मारल्याच्या आरोपात आता अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस चौकशीमध्ये सियाने केतनकडून लग्नाच्या खरेदीसाठी १ कोटी रुपये घेऊन ते चेतनच्या हवाली केल्याचे समोर आले आहे.

केतनने सियाला लग्नाच्या खरेदीसाठी एक कोटी रुपये दिले होते. त्यातून लग्नाची खरेदी करणं अपेक्षित होतं पण सियाने ही सर्व रक्कम चेतनला दिली, जेणेकरुन तो त्याच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करुन त्याची आर्थिक बाजू सक्षम करु शकेल, सांगितलं जात आहे की चेतनची आर्थिक बाजू कमकुवत होती, त्यामुळे चेतनने सियाला सांगितले होते की, त्याला सेटल होण्यासाठी कमीत कमी ३ वर्षांचा कालावधी लागू शकतो.

दरम्यान, तपासातून असेही समोर आले आहे की, केतनला दरीत ढकलण्यासाठी सियाने खाली बसून इशारा दिला होता, त्यानंतर चेतनने केतनला धक्का दिला. दोघांनी आधीच ठरवलं होतं की, सिया बुटाचे लेस बांधण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी खाली बसेल तेव्हाच चेतन केतनला दरीत धक्का देईल. सियाच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, म्हणजे खाली पडताना केतन सियाला पकडून ओढू नये, यासाठी अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले होते.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा