Omraje Nimbalkar left Uddhav Thackeray led Shiv Sena UBT to join Eknath Shinde states reasons; मी त्यांच्या ऊरावर बसणार आहे… ओमराजे निंबाळकरांचा एल्गार, ठाकरेंना जय महाराष्ट्र करताना कारणं सांगितली
Omraje Nimbalkar left Uddhav Thackeray led Shiv Sena UBT to join Eknath Shinde states reasons; मी त्यांच्या ऊरावर बसणार आहे… ओमराजे निंबाळकरांचा एल्गार, ठाकरेंना जय महाराष्ट्र करताना कारणं सांगितली
Maharashtra Politics : ‘मी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, तर त्यांच्या उरावर जाऊन बसणार आहे,’ अशा शब्दात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, धाराशिव : गेल्या सात वर्षांपासून विरोधी पक्षात आहे. खासदार असूनही लोकांची कामे करण्यास अडचणी येतात. लोक कामे घेऊन येतात. दर वेळी त्यांना या वेळी मंजूर होणार नाही, असे किती दिवस सांगायचे? सत्तेत राहिल्याशिवाय विकास होत नाही. मतदारसंघाचा विकास आणि लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत जाणार आहे, अशी माहिती धाराशिवचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी रविवारी गोवर्धनवाडी (ता. धाराशिव) येथे दिली.
ते म्हणाले, की नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हाला जिल्ह्यात एकाही ठिकाणी यश मिळाले नाही. आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी लोकसेवेसाठी सदैव कार्यरत होते; तरीही पराभव झाला. कुठल्या लोभापायी मी शिवसेनेत जात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. खासदार राजेनिंबाळकर रविवारी पुण्याहून गोवर्धनवाडीत आले. त्यानंतर चर्चेतून त्यांनी निर्णय घेतला.
‘मी त्यांच्या उरावर बसणार’
खासदार राजेनिंबाळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करायचा निर्णय घेतला. ‘मी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, तर त्यांच्या उरावर जाऊन बसणार आहे,’ असे टीकास्त्र त्यांनी विरोधकांवर डागले.
त्याचवेळी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांनीही ‘फेसबुक लाइव्ह’द्वारे आपली भूमिका मांडली. ‘मी दुसरीकडे कुठेही गेलो नाही. शिवसेनेतून शिवसेनेतच गेलो आहे. सत्तेत असल्याशिवाय कामे होत नव्हती म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे’, असे आष्टीकर यांनी स्पष्ट केले.
Raj Thackeray | खासदारफुटीवरून राज ठाकरे रोखठोक बोलले; ‘राजकर्त्यांनी नव्हे जनतेनं विचार करावा’
‘ऑपरेशन यशस्वी’
‘ऑपरेशन यशस्वी झाले असून बॉडी सुदृढ आहे’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाच्या खासदारफुटीवर प्रथमच भाष्य केले. तर, पक्षप्रमुखपद सोडून पद लायक शिवसैनिकाकडे सोपविण्याच्या उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरही फडणवीस यांनी टीका केली. उजाड गावाची पाटीलकी सोडतो म्हणणे कितपत योग्य आहे, असे फडणवीस म्हणाले. Uddhav Thackeray : बंडखोरीस कारण की… उद्धव नव्हे, ठाकरेसेनेत दोघांच्या हस्तक्षेपाने खासदार नाराज, शिंदेंच्या 40 मिनिटांच्या Video Call ने ट्विस्ट बाळासाहेबांचे विचार मानणारे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते हे सातत्याने शिंदे यांच्या नेतृत्वात एकत्र येत आहेत. जेव्हा आत्मचिंतन करण्याची वेळ होती तेव्हा उद्धव ठाकरेंनी ते केले नाही. बाळासाहेबांची शिवसेना, धनुष्यबाण आता शिंदेंकडे आहे. बाळासाहेबांचे विचार ते शिवसेनेच्या माध्यमातून पुढे नेत आहेत, अशी टोलेबाजी मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी ऑपरेशन टायगरविषयी शिंदे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी आपण कोणतेही ऑपरेशन अर्धवट ठेवत नसून, ऑपरेशन यशस्वी झाले, तुम्हाला लवकरच ‘गुड न्यूज’ मिळेल, असे ते म्हणाले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा