Headlines

Dharashiv Beed Latur Constituency Legislative Council Election Results BJP Basavaraj Patil Wins by 719 Votes; विधान परिषदेत भाजपचाच बोलबाला; बसवराज पाटलांची रेकॉर्डब्रेक कामगिरी, सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले पहिले उमेदवार


Dharashiv MLC Election Result Basavaraj Patil Wins : धाराशिवमध्ये मतमोजणीपूर्वीच भाजपच्या विजयाचे बॅनर झळकल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. निकाल जाहीर होण्याआधीच विजयाचा दावा करणाऱ्या या बॅनर्सची जिल्हाभर चर्चा सुरू झाली होती.

Dharashiv MLC Election Result Basavaraj Patil Wins
धाराशिव बसवराज पाटील विजयी(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
रहीम शेख, धाराशिव : राज्यातील 17 विधान परिषद जागांपैकी 6 जागांवर महायुतीने याआधीच बिनविरोध विजय मिळवला आहे. उर्वरित 11 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला आहे. तर 17 पैकी 16 जागांवर महायुतीने बाजी मारली आहे. या निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुतीने जोरदार वर्चस्व सिद्ध करत दणदणीत यश मिळवलं आहे. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीची मते फुटल्याचं स्पष्ट दिसून आलं असून, त्याचा थेट फायदा महायुतीच्या उमेदवारांना झाल्याचं चित्र समोर आलं आहे.

राज्यात सर्वाधिक मताधिक्य

धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे बसवराज पाटील यांनी दणदणीत विजय मिळवत काँग्रेसचे महेश देशमुख यांचा 719 मतांनी पराभव केला. बसवराज पाटील यांना तब्बल 844 मते मिळाली, तर महेश देशमुख यांना केवळ 125 मतांवर समाधान मानावं लागलं. 14 मतपत्रिका कोऱ्या असल्यानं बाद ठरल्या. एकूण 988 मतदारांपैकी 983 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
Maharashtra TimesRajendra Raut : इतका इगो, अन् मुझे गिनो… सोलापुरात भाजप उमेदवाराचा 365 मतांनी विजय, मोहिते पाटलांवर नाव न घेता तोंडसुख
या निकालानंतर मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कारण निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाकडे सुमारे 40, काँग्रेसकडे 154 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाकडे 44 असे संख्याबळ असल्याचं मानलं जात होतं. तरीही महेश देशमुख यांना अपेक्षित मते मिळाली नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीतील अनेक मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला पसंती दिल्याचं स्पष्ट होत आहे.
Maharashtra TimesNanded News : पक्षादेशामुळे ऐनवेळी काँग्रेसची माघार, पण बापाच्या निर्णयाचा फटका पोराला बसला; ठाकरेसेनेच्या कृष्णा पाटील आष्टीकरांचा दारुण पराभव

कोणत्या पक्षातून किती मते फुटली?

दरम्यान, निवडणुकीपूर्वी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे महायुतीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना जोर आला होता. या चर्चेचा परिणामही मतदानावर झाल्याची राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा आहे. मतदानाच्या दिवशीच बसवराज पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांचे महायुतीत स्वागत असल्याचं वक्तव्य करून राजकीय संकेत दिले होते. त्यामुळे विरोधी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असावा आणि त्याचा फायदा बसवराज पाटील यांना झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, क्रॉस व्होटिंगची नेमकी कारणे आणि कोणत्या पक्षातून किती मते फुटली? याचे स्पष्ट चित्र पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडींमधून समोर येण्याची शक्यता आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा