Headlines

Youth died in sand smuggling tractor accident in Gondpipri Chandrapur ; अवैध नंबरच्या ट्रॅक्टरमधून रेती तस्करी; भरधाव वेगाने तरुणाचा जीव गेला, आई-वडिलांचा आधार हिरावला


गोंडपिपरी तालुक्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये २४ वर्षीय संतोष मडावी या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. फुरडीहेटी-वढोली मार्गावर भरधाव वेगातील विना क्रमांकाचा ट्रॅक्टर उलटल्याने ही दुर्घटना घडली.

sand mafia accident case Chandrapur rural area details
चंद्रपूर जिल्ह्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या अपघातात एकाचा मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
चंद्रपूर, निलेश झाडे : शासकीय कामांसाठी मुबलक प्रमाणात रेती उपलब्ध होत असताना, घरकुलाच्या बांधकामासाठी मात्र सर्वसामान्यांना रेती मिळवताना मोठा संघर्ष करावा लागत आहे. याच टंचाईचा फायदा आता रेती तस्करांनी उचलला असून, रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत एका २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील फुरडीहेटी–वढोली मार्गावर आज (बुधवारी) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. संतोष मडावी असे मृताचे नाव असून, साहिल कोवे हा गंभीर जखमी आहे.

महसूल विभागाचे दुर्लक्ष अन् घरकुल लाभार्थ्यांची ओढाताण

गोंडपिपरी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जाते, परंतु याकडे महसूल विभागाचे कायमचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. एकीकडे सरकारी कामांसाठी रेतीची कमतरता नसताना, घरकुल लाभार्थ्यांना मात्र अवैध रेती तस्करांवर अवलंबून राहावे लागत आहे. याच तस्करीमुळे आज एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.

भरधाव वेग ठरला जीवघेणा

मिळालेल्या माहितीनुसार, गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा रेती घाटावरून चेक बोरगाव येथील घरकुल लाभार्थ्यासाठी रेती घेऊन एक विना क्रमांकाचा ट्रॅक्टर निघाला होता. महसूल आणि पोलीस विभागाच्या कारवाईपासून वाचण्यासाठी चालक ट्रॅक्टर भरधाव वेगाने चालवत होता. दरम्यान, फुरडीहेटी–वढोली मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली उलटला. ट्रॉलीवर संतोष सुंदरशहा मडावी (वय २४) व साहिल कोवे हे दोघे बसले होते. हा अपघात इतका भीषण होता की, संतोषचा जागीच मृत्यू झाला, तर साहिल गंभीर जखमी झाला.

Maharashtra TimesPune Crime: लग्नाचं आमिष आणि फोटो व्हायरलची धमकी; चंदननगरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, नराधमांना बेड्या

पोलिसांकडून चालकाला अटक

घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक आकाश गोरकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करत आहेत. मृत संतोषच्या पश्चात आई-वडील आणि पाच भाऊ असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या तरुणाचा अकाली मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अवैध ‘टीपी’चा धक्कादायक प्रकार

या घटनेनंतर आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या व्यवहारासाठी वापरण्यात आलेल्या ‘टीपी’वर (Transport Permit) जो ट्रॅक्टर क्रमांक नमूद करण्यात आला होता, तो चुकीचा होता. संबंधित क्रमांकाचा ट्रॅक्टर एका फायनान्स कंपनीने यापूर्वीच जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षात ज्या ट्रॅक्टरने रेतीची वाहतूक केली जात होती, त्यावर कोणताही क्रमांक नव्हता. यामुळे या तस्करीचे रॅकेट किती खोलवर पसरले आहे, हे स्पष्ट होत आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा